चालणे हा उत्तम व्यायाम

सुदृढ राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने व्यायाम करणे गरजेचे आहे. रोजच्या व्यायामामध्ये चालणे हा उत्तम व्यायाम आहे. चालण्यामुळे फार ताण येत नाही, किमान साधने आवश्यक असतात, दिवसाच्या कोणत्याही वेळी चालण्याचा व्यायाम करता येतो....सुदृढ राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने व्यायाम करणे गरजेचे आहे. रोजच्या व्यायामामध्ये चालणे हा उत्तम व्यायाम आहे. चालण्यामुळे फार ताण येत नाही, किमान साधने आवश्यक असतात, दिवसाच्या कोणत्याही वेळी चालण्याचा व्यायाम करता येतो. उन्हाळ्यामध्ये इतर कष्टप्रद व्यायामप्रकारांपेक्षा चालण्याच्या व्यायामास प्राधान्य द्यायला हवे. सक्षम आरोग्याचे लाभ मिळावेत यासाठी तीस मिनिटे जोरजोरात हात हलवत चालण्याचा प्रयत्न करायला हवा. चालल्याने तुमच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते, हाडे बळकट होतात, अतिरिक्त चरबी कमी होते आणि तुमच्या स्नायूंमधील ताकद वाढते. हृदयविकार, दुसऱ्या प्रकारातील डायबेटिस, ऑस्टिओपोरोसिस आणि काही कर्करोग होण्याची शक्यता चालण्यामुळे कमी होते. चालण्याचे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम ·- हृदय आणि फुफ्फुसांचे आरोग्य सुधारते. - हृदयविकार आणि स्ट्रोक्सची शक्यता कमी होते. - उच्च रक्तदाब, कोलेस्टरॉलची वाढलेली पातळी, सांध्यांमध्ये आणि स्नायूंमध्ये होणाऱ्या वेदना, काठीण्य आणि मधुमेह यांचे सुधारित व्यवस्थापन - हाडे मजबुत होतात - स्नायूंची ताकद आणि क्षमता वाढते - शरीरातील चरबी कमी होते. - मानसिक आरोग्य सुधारते दररोज ३० मिनिटे चाला - चालण्याआधी थोडे ‘वॉर्म अप’चे व्यायाम करून मग चालायला सुरुवात करावी. - आधी थोडा वेळ सावकाश चालावे, मग हळूहळू वेग वाढवावा. पंधरा मिनिटे भरभर चालून पुन्हा - चालण्याचा वेग कमी करावा, त्यानंतर पुन्हा हळुहळू वेग वाढवावा. यामुळे पाय, गुडघे आणि हृदय यांच्यावर ताण कमी येतो. - शक्यतो अनवाणी चालू नये. चपला किंवा सँडल घालूनही पूर्ण पायाला आधार मिळत नाही. त्यामुळे मऊ सोल’चे आणि पायांच्या बोटांकडे घट्ट नसलेले बूट घालणे चांगले. - सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही वेळेला चालले तरी चालू चालेल. पण, सकाळी स्वच्छ हवा आणि व्हिटॅमिन डी-तीन देणारा कोवळा सूर्यप्रकाश असल्याने सकाळी चालणे केव्हाही उत्तम. - ज्यांचे नेहमी गुडघे दुखतात किंवा पाठीच्या हाडाची शस्त्रक्रिया होऊन गेली आहे, अशांनी भरभर चालणे अपेक्षित नाही. या व्यक्तींना चालण्याचा व्यायाम करायचा असेल, तर त्यांना सातत्याने सावकाश चालता येईल. - शस्त्रक्रियेनंतर लगेच चालण्याच्या व्यायामाचा आटापिटा नको. गुडघे, हाडे किंवा सांधे प्रचंड दुखत असताना मुद्दाम चालू नका. दुखण्याची तीव्रता कमी होईपर्यंत विश्रांती घेऊन मगच चालणे सुरू करावे.

हवामान