वैजापूर / प्रतिनिधी : शासनाकडे थकीत असलेल्या सातव्या वेतन आयोगाचे राज्यातील पेन्शनर्सचे फरकाचे थकीत असलेला चौथा व पाचवा हप्ता शासनाने त्वरित अदा करावा,केंद्र सेवानिवृत्त कर्मचाऱ्या प्रमाणे दरमहा एक हजार रुपये वैद्यकीय अंशदान सेवा निवृत्तांना द्या, केंद्र कर्मचारी यांना दिलेला वाढीव महागाई भत्ता त्वरित द्या,अंशराशीकरणं ची मुदत देशातील इतर राज्याप्रमाणे १५ वर्षे ची १३ वर्षावर आणा,३० जून ला सेवानिवृत्त झालेल्याची वेतन निश्चिती करून त्यांची बकाया रक्कम ही लवकर द्या,व जि.प.सेवा निवृत्त कर्मचारी व शिक्षक यांचे निवृत्ती वेतन दर महिन्याच्या १ तारखेला राज्यभर करा,अशा विविध मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगर च्या आठ ही तालुक्यातील सेवानिवृत्त कर्मचारी बुधवार रोजी संभाजीनगरला एकवटले व त्यांनी “हम सब एक है,” “पेन्शनर्स एक जुटीचा विजय असो” पेन्शनर्स मागण्या मान्यच करा”अशा घोषणा देत पेन्शनर्स नी शासनाकडे वरील मागण्यांचा पाठपुरावा करण्याचा संकल्प केला,
यावेळी अध्यक्षस्थानी वसंतराव सबनीस होते,त्यांनी संघटनात्मक बांधणी साठी जास्त सभासद जोडण्याचे आवाहन केले, तसेच तालुका शाखानी आपल्या शाखेची धर्मादाय आयुक्त कडे नोंदणी करावी असे आवाहन केले यावेळी गंगापूर शाखेचे अध्यक्ष एस. डी.सदभावे,
कन्नडचे कुंभकर्ण व वैजापूर शाखेचे अध्यक्ष धोंडीरामसिंह राजपूत, व पैठणचे जिजा मोरे यांनी प्रखड मत मांडत जिल्हा शाखेने तालुका शाखेच्या मागण्याकडे दुर्लक्ष करू नये, तालुका शाखेच्या पदाधिकारी वर्गाच्या मागण्यांकडे विशेष लक्ष दिल्यास जिल्हा शाखा अधिक बळकट होईल असेही त्यांनी निवेदन केले,जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष विलास जाधव यांनी उपस्थित पेन्शनर्स ना मार्गदर्शन केले, या प्रसंगी जिल्हा शाखेचे प्रकाश कुलकर्णी, डॉ.अरविंद देशमुख,जनार्दन अमृतकर ,रझवी सय्यद,श्रीमती रजनी नागवंशी,चंद्रकांत वांगीकर, तर परदेशी दादा,एस.एस. सूर्यवंशी, शशिकला सूर्यवंशी,
लीलावती देवकर,यांच्या सह जिल्ह्यातील तालुका शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते, आरंभी दिवंगत पेन्शनर्स ना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, सचिव नामदेव घुगे यांनी आभार मानले.