पुरुषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात महिला आज आघाडीवर का आहेत?.त्यासाठी कोणी संघर्ष केला होता. की देवीच्या कडक उपासणे पूजा केल्याने हे दिवस सर्व महिला वर्गांना लाभले. कृपया थोडा इतिहास समजून घ्यावा आणि द्यावा.नवरात्र उत्सवात कोणती ही माहिती नसलेल्या देवीला प्रसन्न करण्यासाठी नोकरी करणाऱ्या सुशिक्षित आणि अशिक्षित महिला नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या ड्रेस आणि बांगड्या,बिंदी, गळ्यातील माळा,असा साज शृंगार करून कडक उपास करून,विना चप्पल चालतात.त्यांना प्रिंट चॅनल मीडिया खूप प्रसिद्धी देत असते.सोशल मिडियावर ही त्यांचाच धुमाकूळ असतो.पण देवीचे संपूर्ण नांव, आईवडीलांचे नांव,गांव,तालुका,जिल्हा,राज्य,जन्मस्थळ,शिक्षण,लग्न झाले असेल, तर नवरा,मुलंमुली याची कोणतीही अधिकृत माहिती कोणालाच नसते. कोणाला माहिती घ्यावी विचारावी असे कोणत्याही महिलेला वाटत नाही. तरी तिला प्रसन्न करण्यासाठी जीवतोड प्रयत्न केला जातो.नऊ दिवस नऊ रंगाच्या कपड्यात सेल्फी काढुन नवरात्र साजरा केल्या जातो.त्याच महिलांना त्यांना सन्मानाने जगण्यासाठी कोणी संघर्ष केला याची माहिती नसणे.ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.त्यासाठी महिलानी इतिहास वाचला पाहिजे.आणि राजमाता जिजाऊ,सावित्रीबाई समजून घेतल्या पाहिजेत.त्यासाठी मी बुद्धिवादी महिलांना राष्ट्रमाता जिजाऊ यांचा (१७ जून १६७४) 350 वा स्मृतीदिना निमित्याने सेल्फी काढुन साजरी करा असे आवाहन करतो.
सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांची जन्मतारीख ३ जानेवारी,१८३१,जन्मस्थळ नायगाय,सातारा,महाराष्ट्र,मृत्यू तारीख १० मार्च,१८९७,(वय ६६ वर्ष) मृत्यूस्थळ पुणे. राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले यांची जन्मतारीख १२ जानेवारी १५९८ जन्मस्थळ सिदखेड राजा, जिल्हा बुलढाणा,मृत्यू १७ जून १६७४ (वय ७६ वर्ष) पाचाड रायगड किल्ल्याचा पायथा जिल्हा रायगड,अशी संपूर्ण माहिती आहे. यांची जयंती,स्मृती दिन खऱ्या अर्थाने महिलानी मोठ्या उत्सवात साजरा केला पाहिजे.कारण “जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी” असे जीने महिलांना सांगितले.ती जिजाऊ माता तिने छत्रपती शिवाजी महाराज, आणि छत्रपती संभाजी महाराज घडविले त्यांनी अजरामर इतिहास लिहला तो कोणालाच विसरता येत नाही.दुसरी शिक्षणाची देवी जीने प्रथम शिक्षण घेऊन धर्माच्या विरोधात संघर्ष केला त्या सावित्रीबाई फुले यांनी सर्वच जाती धर्माच्या महिलांना शिक्षण घेण्याचे दरवाजे खुले केले.त्यामुळेच आज महिला सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने उभ्या आहेत.त्यांचा जयंतीदिन,स्मृती दिन महिलानी मोठ्या जोशने साजरा केला पाहिजे.त्यांनी संघर्ष केला म्हणूनच आज महिला सर्व ठिकाणी सर्व क्षेत्रात मान सन्मानाने जगतात. अन्यता मनू ची आचार संहिता जगण्याचा अधिकार नाकारून शोषणाचा अधिकार सांगते. जिच्या आईबापचा पत्ता नाही,जन्म,मृत्यू शिक्षण कुठे झाले त्याचा ठाव ठिकाणा नाही तिचा नवरात्र उत्सव नऊ दिवस साजरा केला जातो.याचे कारण काय???.
राष्ट्रमाता जिजाऊ यांचा (१७ जून १६७४) 350 वा स्मृतीदिना सेल्फी काढुन साजरी करा.आपल्या घरातील माँ जिजाऊंचा फोटो दिसला पाहिजे आणि घरातील कँलेंडर हातात घेऊन सेल्फी काढुन स्मृती दिन साजरी करा. आपल्या घरातल्या कँलेडरचा फोटो आणि घरात असणाऱ्या महापुरुषांचा फोटो सोशल मिडियावर शेयर करा.कारण आपण दरवर्षी आपल्या घरी किंवा आपल्या कार्यालयात लावण्यासाठी एक कँलेंडर घेत असतोच.पण तो कँलेंडर कोणते आहे?. त्या कँलेंडर मधुन आपण काय संदेश घेतो?.तो कँलेडर कोणत्या विचाराचा संदेश देत आहे?. हे ही तेवढेच महत्वाचे आहे.तो तुम्हाला विज्ञानवादी बनवतो की अज्ञानवादी अंधश्रद्धा कशी पाळली पाहिजे हे “हा शुभ दिवस,तो अशुभ दिवस” याबरोबर राशी भविष्य,पंचाग सांगते.आपण स्मार्ट मोबाइल, कॉम्प्युटर,वायफाय,5 जी नेटवर्क,वापरण्यासाठी न दिसणाऱ्या विजेचा वापर करतो.मग हे अज्ञान सांगणारे कँलेंडर कशाला घरात पाहिजे?
विज्ञानवादी किंवा सदविवेकबुद्धी वापरण्यास सक्त मनाई करणारे आणि नकारात्मक विचार करण्यास भाग पडणारे कँलेंडर घरात कशाला हवे.कँलेंडर तयार करणारे कालनिर्णय वाले साळगावकर आपल्यात हळुहळु अज्ञान अंधश्रद्धा आपल्या मनावर रुजविण्याचे काम करून धंदा करीत आहेत.शुभ दिवस अशुभ दिवस रुजवला गेला की तिथी पाहणे आलेच.महापुरुषांचे जन्मतारीख,स्मृतीदिन चुकीच्या दाखवून गैरसमज निर्माण करणे हे त्यांचे उदिष्ट असते.सर्व प्रथम महात्मा फुलेनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली, त्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होऊ लागली.त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही तारखेनुसार साजरी करायची कि तिथीनुसार जयंती साजरी करायाची.हा प्रचंड भ्रम निर्माण करून समाजात दरी निर्माण केली.