मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home धार्मिक

देशातील पहिलं आरक्षण देणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षणाच्या माध्यमातून बहुजनांचा उद्धार केला.

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
26 June 2024
in धार्मिक, महाराष्ट्र, मुख्य शहरे
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या मुद्द्यांपैकी एक मुद्दा म्हणजे आरक्षण . खासकरून मंडल आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर यावरून मोठा वादंग झाल्याचं पाहायला मिळालं होतं. आताही मराठा आरक्षणाच्या निमित्ताने हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आरक्षण या मुद्द्यावर सत्ताधारी आणि राजकीय नेत्यांची भूमिका ही सामाजिक कमी आणि राजकीय जास्त असल्याचं दिसून येतंय. पण आजपासून जवळपास सव्वाशे वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी (Shahu Maharaj) क्रांतीकारी निर्णय घेतला आणि कोल्हापुरात देशातील पहिले आरक्षण लागू केलं. बहुजनांच्या उद्धारासाठी त्यांना 50 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय शाहू महाराजांनी घेतला होता.

कोल्हापूर म्हणजे करवीर संस्थानात 26 जुलै 1902 साली मागासवर्गीयांसाठी सरकारी आणि खासगी नोकऱ्यांमध्ये 50 टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. संस्थानातील नोकऱ्यांमध्ये त्यावेळी काही विशिष्ट वर्गाचे असणारे प्राबल्य शाहू महाराजांनी मोडीत काढलं आणि वर्षानुवर्षे पिचलेल्या, अन्यायग्रस्त समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आरक्षणाची विशेष सवलत जाहीर केली.
राजर्षी शाहू महाराज हे 1984 साली कोल्हापूरच्या गादीला दत्तक आले आणि 1994 साली, म्हणजे वयाच्या विसाव्या वर्षी त्यांचा राज्याभिषेक झाला. ब्रिटिशांसोबत लढून राज्य गमवायचं की मिळालेल्या सत्तेचा वापर करून हजारो वर्षांपासून शोषण सहन करणाऱ्या, पिचलेल्या, ज्यांना मनुष्य म्हणून जगताना अधिकार नाकारले गेले अशा दलित, मागासवर्गीयांना मुख्य प्रवाहात आणायचं, त्यांना माणूस म्हणून वागवायचं असे दोन मार्ग शाहू महाराजांसमोर होते. शाहू महाराजांनी दुसरा मार्ग पत्करला आणि बहुजनांच्या उद्धाराचा मार्ग खुला झाला. देशभरात गाजलेल्या वेदोक्त प्रकरणानंतर शाहू महाराजांच्या या कार्याला अधिक वेग मिळाला.
वंचित समाजाला शिक्षणाची दारं खुली करण्याचा निर्णय शाहू महाराजांनी घेतला. कोल्हापुरात त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं आणि जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्यांना महिन्याकाठी एक रुपयाचा दंड ठोठावला.
पण फक्त शिक्षण दिल्यानतंर अपेक्षित सामाजिक बदल घडत नसल्याचं महाराजांच्या लक्षात आलं. कारण त्यावेळी बहुजन समाजातील काही पोरं मॅट्रिक होऊनदेखील त्यांना शिपायांच्या नोकऱ्या कराव्या लागल्या. त्यानंतर शाहू महाराजांनी यावरही तोडगा काढला.
सातव्या एडवर्डच्या राज्यारोहणाच्या कार्यक्रमासाठी शाहू महाराज 1902 साली लंडनला गेले. त्यावेळी त्यांनी युरोपची भ्रमंती केली आणि त्या ठिकाणचे बांधकाम, शिक्षणाच्या सुविधा आणि सामाजिक स्थितीचा अभ्यास केला. असंच वातावरण कोल्हापुरात निर्माण व्हावं यासाठी प्रयत्न करण्याचा निश्चय शाहू महाराजांनी केला.
शाहू महाराजांनी 26 जुलै 1902 रोजी एक क्रांतीकारी जाहीरनामा काढला आणि कोल्हापुरात मागासवर्गीयांसाठी सरकारी आणि खासगी नोकऱ्यांमध्ये 50 टक्के आरक्षण जाहीर केलं.
त्यावेळी कोल्हापूर संस्थानातील नोकऱ्यांमध्ये ब्राह्मण, पारशी, प्रभू, शेणवी या जातींचे प्राबल्य होतं. त्यामुळे या जातींना वगळून इतर सर्व जातींसाठी शाहू महाराजांनी आरक्षण लागू केलं. त्यामध्ये मराठा समाजाचाही समावेश होता.
नोकऱ्यांमध्ये ज्या ठिकाणी मागासवर्गीयांच्या 50 टक्क्यांपेक्षा कमी जागा आहेत त्या ठिकाणी पुढच्या जागा, आरक्षणाचा कोटा पूर्ण होईपर्यंत मागासवर्गीय उमेदवारांच्या भरण्यात याव्यात असे आदेश देण्यात आला होता. तसेच हा आदेश लागू झाल्यानंतर किती जागा भरण्यात आल्या याचा तिमाही अहवालही देण्यात यावा अशा सूचनाही देण्यात आल्या होत्या.
शाहू महाराजांच्या या निर्णयावर उच्चवर्णीय समाजातून संतापाची लाट उसळली. आरक्षण तर लागू केलं पण तेवढ्या पात्रतेचे उमेदवार मिळतील का असा प्रश्न विचारला जावू लागला. शाहू महाराजांनी जाहीर केलेल्या या आरक्षणाच्या धोरणावर लोकमान्य टिळकांसह अनेक मोठ्या नेत्यांनी टीका केली. काहींनी तर थेट ब्रिटशांकडे तक्रारही केली. पण महाराज डगमगले नाहीत. एकवेळ राज्य सोडेन, पण समाजाच्या उद्धाराचं काम सोडणार नाही असं शाहू महाराजांनी ठणकावून सांगितलं.

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

परंपरेच्या नावाखाली तयार करण्यात आलेल्या चिखलात रुतलेले सामाजिक समतेच्या रथाचं चाक शाहू महाराजांनी खऱ्या अर्थाने बाहेर काढलं आणि त्याला चालतं केलं. महाराजांनी खऱ्या अर्थाने सामाजिक न्यायाची संकल्पना राबवली. हजारो वर्षांपासून सामाजिक पिळवणुकीचा बळी ठरलेल्या मोठ्या समाजाला त्यातून बाहेर काढलं.

सन 1992 साली इंद्रा सहानी खटल्याने (Indra Sawhney Case) 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणावर मर्यादा आणली. पण त्याआधी 90 वर्षांपूर्वीच शाहू महाराजांनी कोल्हापुरात 50 टक्के आरक्षणाची तरतूद केली आणि सामाजिक समतोल राखला. त्यामध्ये मराठा जातीसह सर्वच बहुजनांचा समावेश होता.

शाहू महाराजांच्या राज्याभिषेकावेळी संस्थानातील शासकीय नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांचे प्रमाण अत्यल्प होतं. 1922 साली शाहू महाराजांच्या निधनावेळी, नोकऱ्यांमध्ये 75 टक्क्यांहून अधिक वाटा हा मागासवर्गीयांचा होता. हे शाहू महाराजांच्या धोरणाचं यश होतं. स्वातंत्र्यावेळी देशात जेव्हा आरक्षणाच्या धोरणावर चर्चा झाली त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यासमोर शाहू महाराजांचे धोरण होते.

Previous Post

पीक कर्ज देताना शेतकऱ्यांकडे सी-बिल मागितले तर FIR करणार देवेंद्र फडणवीसांचा बँकांना इशारा

Next Post

भाजपाच्या ओम बिर्ला यांनी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली.

Related Posts

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..
छत्रपती संभाजीनगर

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.
ताज्या बातम्या

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य
ताज्या बातम्या

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
Next Post
भाजपाच्या ओम बिर्ला यांनी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली.

भाजपाच्या ओम बिर्ला यांनी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली.

राज्यात मुलांच्या आरोग्याशी खेळ,पोषण आहारात आढळली मेलेली चिमणी.

राज्यात मुलांच्या आरोग्याशी खेळ,पोषण आहारात आढळली मेलेली चिमणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0

Goxbet Казино: анализ рынка, возможности и перспективы

10 March 2026

Bono de Registro en el Casino: Todo lo que Necesitas Saber

10 March 2026

The Ultimate Guide to Playing Slot Machines Online

10 March 2026
शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

Goxbet Казино: анализ рынка, возможности и перспективы

10 March 2026

Bono de Registro en el Casino: Todo lo que Necesitas Saber

10 March 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134