देऊळगाव राजा:-
पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी शासनाने माझी वसुंधरा अभियान राज्यात राबविण्यास सुरुवात केली आहे. यावेळी वृक्ष तोडीमुळे निसर्गाचा समोतल बिघडत चाललेला आहे. त्याचे परिणाम आज दिसत आहेत.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्व नागरिकांनी “माझी वसुंधरा ” या अभियानात सक्रीय सहभाग घेवून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करुन त्यांचे संवर्धन केले पाहिजे, असे आवाहन अरुण मोकळ यांनी केले. देऊळगाव राजा नगरपरिषद तर्फे शहरामध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.तसेच नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या हेतूने छत्रपती श्री शिवाजी हायस्कूल येथून वृक्ष दिंडी काढण्यात आली.
जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या संकल्पने नुसार एक विद्यार्थी एक वृक्ष हे उद्दिष्ट समोर ठेऊन या अभियानात शाळकरी विद्यार्थ्यांना ही सहभागी करण्यात आले होते.सदर अभियानाला उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी हिरवी झेंडी दाखवली .यावेळी नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अरुण मोकळ , तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, पोलीस निरीक्षक संतोष महल्ले , शिक्षक वृंद , नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी विद्यार्थी पत्रकार मान्यवर उपस्थित होते.तसेच श्री शिवाजी हायस्कूलचे मराठी व उर्दू विभागाचे शिक्षक पालिकेचे कर्मचारी ‘ विद्यार्थी, शिवाजी हायस्कूल व समर्थ कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी, आदींनी वृक्षारोपणा मध्ये आपला सहभाग नोंदविला . व शहरातील विविध भागात वृक्षारोपण केले .
शहरातील श्री शिवाजी हायस्कूल – दत्तनगर – शिवाजीनग -र सिविल कॉलनी – आदर्श कॉलनी – पिंपळनेर – आमना नदी परिसर – प्राथमिक शाळा इ. भागामध्ये पालिकेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले मुख्याधिकारी अरुण मोकळ यांच्या पुढाकाराने यशस्वी नियोजनामध्ये पावसाळ्याच्या पर्वावर संपूर्ण शहरात सतत आठ दिवस वृक्ष लागवड कार्यक्रम होणार असल्याची माहिती मोकळ यांनी दिली. सदर अभियानामुळेभविष्यात शहरातील पर्यावरण समतोल राखण्यास नक्कीच मदत होईल एवढे मात्र नक्की.