मुंबई (घाटकोपर) दि.3 : माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजना, घाटकोपर,(पूर्व)हा पुनर्विकास प्रकल्प एमएमआरडीए आणि एसआरए यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे.माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर झोपडपट्टीचे पुनर्वसन ही केवळ एक योजना नसून राज्य शासनाने झोपडपट्टीमुक्त मुंबईच्या संकल्पपूर्तीच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील लाभार्थ्यांना धनादेश वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर,कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे,आमदार पराग शहा,मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ.संजय मुखर्जी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेद्र कल्याणकर ,माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील स्थानिक रहिवासी उपस्थित होते.
या प्रकल्पामुळे झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांचे जीवनमान उंचावणे, त्यांना स्वत:चे हक्काचे घर मिळावे यासाठी हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार आहे.
तर या प्रकल्पा मध्ये एमएमआरडीए विकासक म्हणून काम करत आहे. मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याच्या संकल्पासाठी हा प्रकल्प महत्वाची भूमिका बजावणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकार ने महाराष्ट्रात विविध योजना सुरू केल्या आहेत.त्यापैकी मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना, युवकांसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण,ज्येष्ठांना वयोश्री योजना, मुलींना मोफत शिक्षण,इत्यादी व समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न आमचे सरकार करीत आहे.असेही त्यावेळी शिंदे यांनी सांगितले.
माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथील सुमारे १६५७५ हजार घरांचा पुनर्विकास करण्यासाठी एमएमआरडीए आणि एसआरए यांच्या भागीदारी तत्त्वावर करार झाला आहे.पुनर्विकास काळात पर्यायी निवाऱ्याच्या भाड्यापोटी झोपडीधारकांना दरमहा १५ हजार तर दुकानदार,व्यावसायिकांना दरमहा २५,३० व ३५हजार भाडे देण्यात येणार आहे. आज त्याच कार्यक्रम चा शुभारंभ करत झोपडीधारकाना भाड्याचे धनादेश वाटप करण्यात आले.