बुलडाणा:- बुलडाणा जिल्ह्यात नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत असणारे पोलीस स्टेशन अंढेरा चांगल्या कामा पासून उपेक्षित जरी असले तरी मागील काही काळात या ठाण्याला लाभलेले ठाणेदार पोलीस निरीक्षक श्री विकास पाटील हे आपल्या कर्तव्यात उत्तीर्ण होत असल्याचे दिसून येते. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गुन्हेगारीचे प्रमाण त्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे घटल्याचे दिसून येत आहे.
अंढेरा पोलीस ठाण्याला पोलीस निरीक्षक विकास पाटील हे लाभले तेव्हापासून ग्रामीण भागात त्यांनी आपली छाप उमटविली. वर्षभराच्या आपल्या टीम सोबत विविध प्रकरण हाताळत अगदी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाटील यांनी अनेक वाद मिटवले,पाटील हे अंढेरा येथील पोलीस ठाण्यात 6 जुलै 2023 मध्ये रुजू झाले. यांच्या काळात अर्थात 2023 या वर्षात या मागील वर्षीच्या च्या तुलनेत घडलेल्या प्रत्येक गुन्ह्याचे प्रमाण कमी दिसून येत आहे.मागील काळा मध्ये एकूण 79 गुन्हे दोन आहे तर पाटील यांच्या कार्यकाळात 62 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली तर दारुचे गुन्हे 117 नोंद झाले. अंढेरा पोलीस ठाण्यांतर्गत गुन्ह्यांच्या प्रमाणात निश्चितच घट झाली आहे.
◾शेतकऱ्यांना दिला ऑन द स्पॉट न्याय…
अंढेरा हद्दीतील शेतकऱ्यांचे सौर ऊर्जा प्लेट्स मोठ्या प्रमाणात चोरीला जातात या प्लेट्स अत्यंत महाग असल्या कारणाने यावर चोरट्यांची नजर जास्त असते,बाजारात या प्लेट्स ना चांगलीच मागणी असते त्यामुळे ग्रामीण भागात शेतातून सौर ऊर्जा प्लेट्स चोरीला जातात ,याबाबत चार गुन्ह्यांची नोंद अंढेरा पोलीस स्टेशन ला झाली असता ,यावर अगदी युद्धपातळीवर तपास करत विकास पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या साहाय्याने 100% माल रिकव्हरी केली यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या सौर ऊर्जा प्लेट्स त्यांना मिळाल्या,त्यांचे होणारे आर्थिक नुकसान विकास पाटील यांच्या मुळे वाचले यामुळे शेतकऱ्यांनी पाटील व त्यांच्या तत्पर सेवे चे कौतुक केले.
◾चोरी गेलेले ट्रॅक्टर दु चाकी चा तपास अवघ्या काही तासात लावून वाहन मालकांना सुपूर्त केले…
अंढेरा हद्दीत एक ट्रॅक्टर व दु चाकी चोरीला गेली अशी तक्रार पोलीस स्टेशन अंढेरा येथे येताच अवघ्या काही तासात ट्रॅक्टर व दु चाकी चा तपास लावून पाटील यांनी वाहन मालकांना वाहन सुपूर्त केले.अनेक सामान्य लोकांचे चोरी गेलेले मोबाइल अगदी तत्परतेने तपास करत हस्तगत केले.
◾जिल्ह्यात रेती माफिया विरुद्ध MPDA लावणारे एकमेव ठाणेदार…
देऊळगाव राजा तालुक्यातील अवैद्य रेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतात या विरुद्ध कठोर कारवाई करत विकास पाटील यांनी रेती माफिया विरुद्ध कारवाई करत MPDA ,तडीपार सारख्या कारवाह्या केल्या,याबाबत संबंध जिल्हाभर या कारवाई ची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.व या धाडसी निर्णयामुळे पाटील यांचे कौतुक ही झाले.
◾अंढेरा पोलीस स्टेशन प्रवेश हद्दीत अगदी मोक्याच्या ठिकाणी सी सी टी व्ही बसवले…
विकास पाटील यांच्या दूर दृष्टीकोणाचा प्रत्येय म्हणजे पाटील यांनी परिसराचा अभ्यास करत चोरी चे प्रमाण कमी करण्याच्या हेतूने तर्क वितर्क लावत अंढेरा पोलीस स्टेशन हद्दी बाहेरील येणाऱ्या मार्गावर अगदी महत्वाच्या मोक्याच्या लोकवर्गणीतून तर काही ठिकाणी ग्रामपंचायत च्या माध्यमातून काही वयक्तिक स्वरूपात गावा गावात जाऊन सी सी टी व्ही लावण्याचा निर्णय घेतला,यामध्ये गांगलगाव,कवठळ,कोनड,देऊळगाव घुबे, पिंपळवाडी फाटा, मिसळवाडी,शेळगाव वा.इसरूळ, मेरा चौकी ,मेरा बु.रामनगर फाटा/गाव,अंचरवाडी फाटा,सरंबा गाव,बायगाव खुर्द ,काटोडा,रोढा, असे एकूण 16 गावात सी सी टीव्ही बसवले असून अजून उर्वरित गावात लवकरच गावामध्ये जाऊन शक्य होईल तिथे ग्रामपंचायत च्या माध्यमातून तर काही ठिकाणी लोकवर्गणीतून सी सी टीव्ही बसवणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
यामुळे अंढेरा पोलिस स्टेशन हद्दीत रोबरी, चोरी दरोड्याचा प्रमाण कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे, पाटील यांच्या या कार्यामुळे ग्रामीण भागात त्यांचे कौतुक होत आहे.आपल्या 14 महिन्याच्या कार्यकाळात अनेक वेगळ्या कारणाने ओळखले जाणारे अंढेरा पोलीस स्टेशन मध्ये चांगले अभियान राबत गुन्हे कश्या प्रकारे कमी करता येईल, होणारे2 गैर प्रकार लक्षात घेता पाटील यांनी अवैध धंद्यावर धाड सत्र सुरूच केले आहे , याबाबत बोलताना पाटील यांनी सांगितले वरिष्ठांच्या मार्गदर्शनात केलेल्या कार्यात कधीही यशच हाती लागते. पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत होते,त्यांनी गुन्हेगारी थांबविण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक, हवालदार,गावातील नागरिक व तंटामुक्त समित्यांचे सहकार्य मिळाल्याचे सांगितले.प्रशासन व जनता यांची सांगड घालून कसे समाज उपयोगी कार्य करता येतात हे पाटील यांनी आपल्या कार्य शैलीने दाखवून दिले आहे.पाटील यांनी केलेल्या कठोर कारवाह्या काहिंना बऱ्याच टोचल्या कारणाने विकास पाटील यांना टार्गेट केले जात असल्याचे परिसरात बोलले जात आहे.