जालना : जाफराबाद (प्रतिनिधी) येथिल सिद्धार्थ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन हिंदी पंधरवडा साजरा करण्यात आला.सदरील कार्यक्रमाचे आयोजन हिंदी विभागाच्या वतीनं करण्यात आले.क्रार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश देशमुख यांनी भूषविले.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून हिंदी विभागाचे प्रा.डाॅ.सुदाम पाटील यांनी हिंदी भाषेच्या विकासासाठी, हिंदी भाषेच्या प्रसार प्रसारात सर्व देशवासीयांना पुढं आले पाहिजे, हिंदी भाषेला राष्टभाषेचा दर्जा आज पर्यंत मिळाला नाही याचिही खंत व्यक्त केली.आज हिंदी भाषा देश -विदेशात भारताचा सन्मान वाढवत आहे,विदेशी पर्यटक, विदेशी लोक हिंदी भाषेचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहेत.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागप्रमुख प्रा.अनिल वैद्य यांनी केले.त्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात हिंदी भाषा ही मानवता,संस्कती, संस्कार शिकविणारी भाषा आहे असे मत प्रकट केले.जास्तित जास्त लोकांपर्यंत हिंदी भाषा पोंहचविण्यासाठी सर्व देशबांधवांनी प्रयत्न केले पाहिजेत असं मत व्यक्त केले.ते पुढे म्हणाले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी भरुच येथिल गुजरात येथे झालेल्या शैक्षनिक सम्मेंलनात अध्यक्षिय भाषणांत बोलतांना म्हणाले देशाला राष्ट्रभाषा ची आवश्यकता आहे.भारतीय भाषांमध्ये फक्त हिंदीच देशाची राष्ट्रभाषा होऊ शकते. स्वतंत्र भारताच्या संविधान सभेत १४ सप्टेंबर १९४९ रोजी हिंदी भाषेला राष्टभाषेचा दर्जा दिला . हिंदी विभागातील प्राध्यापक सैलीप्रकाश वाघमारे यांनी हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य केले.
सदरिल कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.शालीनी वाघ व हार्षदा तांबेकर या विद्यार्थिनिंनी केले.हिंदी पंधरवडा साजरा करत असतांनाच हिंदी विभागाच्या मुलींनी भित्तीपत्रिका तयार केल्या.त्यात कु.वाघ शालीनी,कु.हार्षदा तांबेकर,कु.बुशरा पठाण,कु.भाग्यश्री मोरे,कु.पूजा देव्हडे ,पूजा क्षिरसागर,कु.दिशा काळे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश देशमुख, उपप्राचार्य डॉ.सुनिल मेंढे यांच्या शुभहस्ते पत्रिकेचे विमोचन करण्यात आले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु.भाग्यश्री मोरे या विद्यार्थिनींने केले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.