मुंबई प्रतिनिधी : आगामी विधानसभा निवडणुकी 2024 च्या पार्श्वभूमीवर नुकत्याच लागलेल्या आचारसंहितेच्या अनुषंगाने घाटकोपर पूर्व भागात माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ,विभागात काहीही चुकीची घटना घडू नये यासाठी पोलिसांचे महत्त्वाचं पाऊल उचलत शिस्त पद्धतीने पंतनगर पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला होता. त्यावेळी कायदा सुव्यवस्थेचा पालन करावे कोणी जातीय व सामाजिक तेढ निर्माण करणारे व सोशियाल मीडिया वर एखादा मेसेज येत असेल व वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर लाऊन ज्यानी कायदा सुव्यवस्था बिघडत असेल तर त्वरित नागरिकांनी पोलीस हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधावा व नागरिकांनी कोणत्याही मोहाला बळी न पडता कायद्याचे पालन करत कोणत्याही प्रकारचे कायद्याचे उलंघन न करता बिनधास्त 100 टक्के मतदान करावे.असेही आवाहन करण्यात आले होते.
मुंबई पोलिस आयुक्त यांच्या आदेशाने व पंतनगर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश केवळे व इतर अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सी आर पी एफ यांच्या काही तुकड्या, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश होता.हा रूट मार्च पंतनगर पोलीस ठाणे ते रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर असा आयोजित करण्यात आला होता.