झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अंतर्गत अंतिम परिशिष्ट दोन झालेल्या, मात्र अनेक वर्षापासून तांत्रिक व आर्थिक वा इतर कारणाने रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन किंवा पूर्ण न झालेल्या योजनेतील पात्र झोपडी धारकांकडून खरेदी केलेली झोपडी अंतिम परिशिष्ट दोन मध्ये समाविष्ट होत नसल्यामुळे अनेकांना मोठ्या समस्याला सामोरे जावे लागत आहे.झोपडीवासियांच्या प्रश्न आणि त्यांच्या अडचणी लक्षात घेता घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातील आमदार परागभाई शाह यांच्या प्रयत्नाने राज्य शासनामार्फत माता रमाबाई आंबेडकर नगर, गंधकुटी विहार येथे झोपडीधारकांसाठी “अभय योजना” शिबिर आयोजित करण्यात आली होती. या योजनेत २०११ पूर्वी निश्चित झालेल्या परिशिष्ट दोन मधील पात्र अर्जदाराकडून झोपडी विकत घेणाऱ्या खरेदीदाराला या योजने नुसार आता निवासी झोपडीसाठी ६५००० हजार रुपये, तर अनिवासी झोपडीसाठी ११००००हजार रुपये शुल्क आकारून झोपडीधारकास अंतिम परिशिष्ट दोन मध्ये समाविष्ट करून नियमित करण्यात येते.या योजनांचा कालावधी मर्यादित असल्याकारणाने, वेळेत लाभ घेणे महत्त्वाचे असून त्याकरिता संत नामदेव गृह.नि.सोसायटी, ओम साई गणेश गृह.नि. सोसायटी, अष्टविनायक गृह.नि.सोसायटी, लोकसेवा गृह.नि.सोसायटी, रमाबाई आंबेडकर रहिवासी संघ व सिंहगड गृह.नि.सोसायटी अशा अनेक सोसायट्या मधील सर्व पदाधिकारी व झोपडीधारकांनी प्रचंड संख्येने या शिबिरास उपस्थित राहून योजनेचा लाभ घेतला.सदर शिबिरात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबई येथील सक्षम प्राधिकारी ८ चे उपजिल्हा अधिकारी स्नेहा उबाळे तथा बाळू गवळी,प्रमोद बागुल,रवींद्र कामटेकर नायब तहसीलदार, देवरुकर,मूर्ती मॅडम महसूल अधिकारी,आशिष सुर्वे कैलास गोडे हर्ष पवार महसूल सहायक, वृषाली दांडेकर टायपिस्ट, सदनिका हस्तांतरण व वारसपत्र अधिकारी उपस्थित राहून “अभय योजनेचे” संदर्भात झोपडीधारकांना महत्व पूर्ण माहिती देत कामकाज पाहिले.
तसेच शिबिरास सहकार्य करत स्थानिक कार्यकर्ते अर्पिता शेलार, रचित त्रिवेदी, विशाल पोज,अजय बागल, राजू बर्गे, तुषार कांबळे, संजय (बाबू) दरेकर, मधुरा तावडे, संगदीप केदारे, कुणाल देवेंद्र रत्नम, सचिन भोसले, पप्पू वर्मा, सुनील शृंगारे आदी. उपस्थित राहुन कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न झाला.