जालना: प्रतिनिधी
जे. एस. महाविद्यालय जालना येथे संपन्न झालेल्या अंतर महाविद्यालयीन धनुर्विद्या स्पर्धेत सिद्धार्थ महाविद्यालयाच्या कु.कोमल दत्ता अवसारे हिने इंडियन राउंड आर्चरी या क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकले ,तर यश राजू साळवे याने इंडियन राउंड आर्चरी(धनुर्विद्या) या क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक जिंकले त्यांच्या या कामगिरीमुळे दोन्ही खेळाडूंची निवड अखिल भारतीय विद्यापीठ धनुर्विद्या स्पर्धा साठी झाली आहे.या स्पर्धा गुरु काशी विद्यापीठ भठिंडा,पंजाब येथे होणार आहेत.त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक -अध्यक्ष दादासाहेब म्हस्के,संस्थेचे सचिव प्रा.डॉ.राहुलभाऊ म्हस्के तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.र.तु.देशमुख उपप्राचार्य प्रोफेसर डॉ.सुनील मेढे ,उपप्राचार्य डॉ. सर्जे एस.के.उपप्राचार्य प्रा.हिवराळे व्हि.टी.यांनी अभिनंदन केले तसेच खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन
केले.महाविद्यालयाचेक्रीडा प्रमुख प्रा.वझरकर यु.एम.प्रा.वाहेद पटेल ,प्रा.शिवाजी वैद्य यांनी परिश्रम घेतले.