नांदेड (प्रतिनिधी ):
पत्रकार संरक्षण समितीची नांदेड जिल्हा तसेच बिलोली तालुक्याची कार्यकारिणी नुकतेच करण्यात आले. बिलोली शहरातील आनंद गार्डन येथे आयोजित कार्यक्रमात जाहीर करण्यात आली आहे. यावेळी नांदेड जिल्हा संघटक पदी बिलोली येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार लक्ष्मीकांत गोविंदराव कलमूर्गे यांची निवड करण्यात आले आहे.
यावेळी कार्यक्रमात बिलोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संरक्षण समिती जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड, जिल्हा कार्यकारणी सदस्य अनिल मोटरगेकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होते. गेल्या सतरा वर्षांपासून पत्रकार क्षेत्रात तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या एका निर्भीड पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते म्हणून ठसा उमटविणाऱ्या व्यक्तीला न्याय मिळाले असल्याचे बोलले आहेत. उत्कृष्ट लिखाण तसेच भ्रष्टाचार आणि अन्याया विरुद्ध वाचा फोडीत अनेकांना न्याय मिळवून दिले आहेत. त्याच कार्याला समर्पित म्हणून यांची निवड करण्यात आले असल्याचे कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी म्हटले आहेत.
पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी होणे अत्यंत गरजेचे असून, पत्रकारांवर होणारे हल्ले पाहता लवकरात लवकर त्या संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावे. यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कलमुर्गे यांनी म्हटले आहेत. पत्रकार हा समाजाचा चौथा स्तंभ असून निर्भीडपणे अन्यायाविरुद्ध तसेच भ्रष्टाचाराविरुद्ध लेखन करत असताना अनेक ठिकाणी त्यांच्यावर हल्ले होताना दिसून येत आहे. असे हल्ले पुन्हा पुन्हा होऊ नये किंवा पत्रकारावर हल्ला करण्याची कोणाची हिंमत होऊ नये, यासाठी लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावे म्हणून प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहेत.
त्याचबरोबर बिलोली शहरात पत्रकारासाठी पत्रकार भवन करण्यात यावे यासाठी ही प्रयत्न करणार असल्याचे कलमुर्गे यांनी म्हटले आहेत.
नवनियुक्त पत्रकार बांधवांना पोलीस निरीक्षक अतुल भोसले तसेच महेंद्र गायकवाड यांच्या हस्ते नियुक्तीपत्र तसेच ओळखपत्र देण्यात आले. यावेळी महेंद्र गायकवाड तसेच पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी नवनियुक्त पत्रकार बांधवांना मार्गदर्शन करताना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच शेख जावेद, साई खंडेराय, गोनशेटवाड, कमलाकर जमदडे, माधव पटणे, मारोती भुसावळे, प्रसाद कुलकर्णी, नंदकुमार स्वामी, संजय हलबुर्गे, साईनाथ गुडमलवार, साई कलमूर्गे, विष्णू बंडेवाड, रवी यंबडवार, पत्रकार संरक्षण समिती कुंडलवाडी अध्यक्ष दत्ता हमंद, उपाध्यक्ष विजय पोतनकर, सचिव श्रीकांत बोलचेटवार, संघटक विनोद काळेवार आदींनी शुभेच्छा दिले आहेत.