जाफराबाद ,जालना : प्रतिनिधी
सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जाफराबाद येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे “राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक सलोखा” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश देशमुख यांनी भूषविले. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. बी.बी.चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. आपल्या प्रभावी भाषणात त्यांनी भारतातील विविधता, एकता आणि सामाजिक सलोखा यांचे महत्व विशद केले. त्यांनी विद्यार्थ्यांना समाजात ऐक्य, सद्भावना आणि सहिष्णुता वाढविण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यक्रम आधिकारी प्रा. डॉ.जगतवाड एस.पी. यांनी केले तर भाषणात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी समाजसेवेत सक्रिय सहभाग घेण्याचे महत्व स्पष्ट केले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील , एनएसएस स्वयंसेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सरिता मनियार
यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.डाॅ.प्रदीप मिसाळ यांनी केले.
कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.