घाटकोपर (मुंबई) : प्रतिनिधी
घाटकोपर येथील माता रमाबाई आंबेडकर नगर मधील एक भाग असलेला कामराज नगर येथील २००५ सालापासून ओम साई गणेश सोसायटी चा एस आर ए प्रकल्प राबवित असलेल्या नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. चे मालक कुणाल वर्धन, चंपालाल वर्धन यांने ५०० कोटीचा घोटाळा केला आहे.असे काँग्रेस चे कार्यकर्ते जाहीर आमरण उपोषणकर्ते अनिल मोरे, माता रमाई सहकारी गृहनिर्माण फेडरेशन व ओम साई गणेश सहकारी गृहनिर्माण संस्था यांचे म्हणणे आहे.तेथील ५०० सदनिकाधारकांना कागदोपत्री ३०० चौ. फुटाची सदनिका दिल्याचे दाखवून प्रत्यक्षात २६९ चौ. फुटाची सदनिका देऊन त्यांची फसवणूक करण्यात आली आहे.१९९१ चा DCPR चा २०३४ मध्ये कन्व्हर्जन करताना फक्त सेल इमारतीचा FSI वाढवला.यामुळे विकास १५००० चौरस मीटर चा अधिक लाभ सेल इमारतीसाठी एस आर ए अधिकाऱ्यांनी दिला.पण त्या झोपडी धारकांसाठी ही सुधारणा १९९१ ते २०३४ मध्ये कन्व्हर्ट झाली होती. पण त्यांना २६९ चौ. फूट म्हणजे च DCPR १९९१ प्रमाणेच घर दिले आहे.यामुळे विकासक कुणाल वर्धन व चंपालाल वर्धन यास १ लाख ६३ हजार, ३५० चौ. फूट, FSI विकण्यासाठी अधिकचा मिळाला अशा प्रकारे एस आर ए अधिकारी व विकासक चंपालाल वर्धन यांनी १ लाख ६३ हजार ३५० चौ. फूट × २५००० रुपये असा एकूण ४०० कोटी ८३ लाख ७५ हजार रुपयाचा घोटाळा केलेला आहे.या विरोधात सोसायटीने २०१९ पासून सतत तक्रार करूनही एस आर ए अधिकारी झोपडीधारकांना न्याय देत नाही.बऱ्यापैकी झोपडीधारक दलीत समाजाचे असून याच जातीवादी दृष्टिकोनातून त्यांना अपुऱ्या सुविधा देत त्रास दिला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.तरी या विकासकावर ५०० कोटी रुपयांचा घोटाळा चा आणि झोपडीधारकांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेस चे कार्यकर्ते आमरण उपोषणकर्ते अनिल मोरे,आर पी आय कार्यकर्ते रवी नेटावटे, माता रमाई सहकारी गृहनिर्माण फेडरेशन व ओम साई गणेश सहकारी गृहनिर्माण संस्था यांनी संबंधित खात्याला केली आहे.












