जालना प्रतिनिधी : वाडी बु येथील जवाहर विद्यालयात आज भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.कार्यक्रम चे सूत्रसंचालन कोमल पालोदे व दिव्या सोनवणे यांनी केले, तर प्रस्तवना ए.पी पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन एस.एस पगारे यांनी केले
यावेळी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित भाषणे, कविता व प्रेरणादायी विचार सादर केले. सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणासाठी दिलेले योगदान, समाजातील अंधश्रद्धा व अन्यायाविरुद्ध केलेला संघर्ष यावर प्रकाश टाकण्यात आला.
मुख्याध्यापक पि.ई.शिंदे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सावित्रीबाई फुले यांचे विचार आजच्या पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचे सांगितले. शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडवण्याचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतील प्रा.एम. एल सोन्ने व एस. आर मिरकर यांनी विद्यार्थ्यांनी स्त्री-पुरुष समानता व शिक्षणाचा प्रसार करण्याची प्रतिज्ञा देली. कार्यक्रमाचे यशस्वी करण्यासाठी एस.आर वावधने बि.एस सिरसाठ, आर.एस तिडके,आर.एस मिरगे, एस.बी.निकम, जी.एस राऊत पि.पि वाघमारे, जि.एस. शेरकर, एच.के. कलम, बी. आर. वाघमारे, पि. टी. तेलंगरे, के. एस. लोखंडे, ए. पि. झिणे, वाय. एस. लांबे, ए.जी. चव्हाण, आण्णा ठाले, सुभाष उजागरे यादी शिक्षकवृंद व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.











