सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.21, अपेक्षेप्रमाणे माजी मंत्री आ. अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव तथा नॅशनल सहकारी सूतगिरणीचे संचालक अब्दुल आमेर अब्दुल सत्तार यांनी आज अंभई गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला.
याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पा. तायडे, नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्यासह उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, शिवसेना पदाधिकारी किशोर अग्रवाल, नंदकिशोर सहारे, मनोज झंवर, विशाल जाधव, राजू गौर, अक्षय मगर, गौरव सहारे, आशिष कटारिया, अब्दुल करीम चेअरमन, सरपंच नासेर पठाण, प्रमोद शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
















