छत्रपती संभाजीनगर – देशभक्ती वर आधारित जो नागरिकांवरील हिंसाराच्या परिणामावर आणि लष्करांकडून मिळालेल्या शक्तिशाली प्रतिसादावर केंद्रित करणारा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येत असून नय्युम खान एंटरटेनमेंट प्रस्तुत “द रिटर्न ऑफ द आर्मी मॅन” हिंदी आणि तेलुगू भाषेत हा चित्रपट ६ फेब्रुवारीला जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात पुलवामा हल्ल्यातील अतिरेकी गटाने मारलेल्या नागरिकाची कथा दर्शवली आहे यामुळे यातून लष्कराचा रोष कसा भडकलेला आहे हे दर्शविण्यात आले आहे, त्यामुळे हा चित्रपट पाहणं रंजक ठरणार आहे.
या सिनेमाचे दिग्दर्शक बाबू भट्ट यांची एक सुंदर दिग्दर्शित हृदयस्पर्शी स्टोरी या सिनेमातून अनुभवता येणार आहे, त्याचप्रमाणे आयकॉनिक ॲक्शन मुव्ही हिंदी द रिटर्न ऑफ द आर्मी मॅन नय्युम खान एंटरटेनमेंट अभिनेता कास्टिंग, एक्टिंगचे धुरंधर कलाकार गोविंद नामदेव, मनोज जोशी आणि प्रभाकर बाहुबली कास्ट, यांच्यासह शालिनी चव्हाण, रुजलेले खिलाडी शाबास खान, ज्ञानप्रकाश, मुकेश भट्ट, लोकेश शर्मा, अमित शर्मा, मोनिका बंगाळ, दीपक चौबे, आदी कलाकारांच्या भूमिका यामध्ये बघावयास मिळणार आहे.
















