ला.प्र.वि. घटक :- जालना
तक्रारदार:- पुरुष वय 33, वर्ष
फिर्यादी :- सरकारतर्फे – बाळू संपती जाधवर वय 47वर्ष, पद पोलिस उप अधीक्षक ला प्र वि कार्यालय, जालना
आरोपी :- 1)इतर लोकसेवक:- ज्ञानेश्वर लक्ष्मण चौधरी वय 29 वर्षे पद गृहनिर्माण अभियंता (कंत्राटी),पंचायत समिती जालना,रा. चांदई टेपली ता.भोकरदन जि.
तक्रार :दि.21/01/2026
यातील तक्रारदार हे शेतकरी असून त्यांचे वडिलांचे नावे सन 2024-25 या वर्षाच्या प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले असून त्याचा पहिला हप्ता तक्रारदार यांचे वडिलांचे बँक खात्यावर 15,000/- हजार रुपये जमा झाले आहेत.दुसऱ्या हप्त्यासाठी तक्रारदार यांनी इतर लोसेवक ज्ञानेश्वर चौधरी यांच्याकडे दि 30/12/2025 रोजी विचारणा केली असता श्री चौधरी यांनी तक्रारदार यांचेकडे 10,000/-रु ची मागणी केली.दरम्यानच्या काळात तक्रारदार हे बाहेर राज्यात गेले असल्याने त्यांचे श्री चौधरी यांचेशी बोलणे झाले नाही.आज रोजी तक्रारदार यांनी इतर लोकसेवक चौधरी यांना फोन करून दुसऱ्या हप्त्या बद्दल विचारणा केली असता श्री चौधरी यांनी तुला बोलल्या प्रमाणे केल्याशिवाय तुझ्या वडिलांच्या घरकुलाचा दुसरा हप्ता मिळणार नाही असे सांगितले.अशा आशयाची तक्रार जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली.
पडताळणी : आज दिनाक 21/01/2026 रोजी तक्रारदार हे पंच यांचे सोबत इतर लोकसेवक ज्ञानेश्वर लक्ष्मण चौधरी,गृहनिर्माण अभियंता (कंत्राटी),पंचायत समिती जालना यांना भेटण्यासाठी सत्कर कॉम्प्लेक्स जालना येथे गेले असता,इतर लोकसेवक श्री चौधरी यांनी पंच यांचे समक्ष 10,000/- रु ची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
सापळा :- दि.21/01/2026
सदर तक्रारीवरून केलेल्या पडताळणीत सत्यता आढळून आल्याने पंचासमक्ष सापळा कारवाई आजमावली असता इतर लोकसेवक ज्ञानेश्वर लक्ष्मण चौधरी वय 29,गृहनिर्माण अभियंता (कंत्राटी) पंचायत समिती जालना यास तक्रारदार यांचेकडून पंच यांचे समक्ष 10,000/- रु लाच घेताना सापळा पथकाने हॉटेल विठ्ठला सत्कर कॉम्प्लेक्स जालना येथे लाचेचे रकमेसह ताब्यात घेतले.
आरोपी अंगझडती :- इतर लोकसेवक ज्ञानेश्वर लक्ष्मण चौधरी यांचे अंगझडतीत लाच रक्कम 10,000 रु, एक आय फोन ,एक गूगल फिक्सल मोबाईल, एक अंगठी मिळून आली.
मोबाइल जप्ती :- मोबाईल हॅन्डसेट तपासणी करून आवश्यकता असल्यास जप्त करण्याची तजवीज ठेवली आहे.
आलोसे यांची घरझडती :- आलोसे यांची घरझडती प्रक्रिया सुरु आहे.
गुन्हा रजि. नंबर व कलम,पोस्टे कदीम जालना जि जालना येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
गुन्हा नोंद दिनांक व वेळ :- पोलिस स्टेशन कदीम जालना जि.जालना येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
आरोपी अटक दिनांक व वेळ :- आरोपि यास ताब्यात घेण्यात आले असुन गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे.
सापळा अधिकारी :-
बाळू संपती जाधवर,वय 47 वर्ष ,पद पोलिस उप अधीक्षक ला प्र वि कार्यालय, जालना.
पर्यवेक्षण अधिकारी :-
श्री. बाळु संपत्ती जाधवर , वय 47 वर्ष, पोलीस उप अधीक्षक , लाप्रवि जालना.
तपास अधिकारी :-शरदचंद्र सुरेशराव रोडगे वय 37 वर्ष पोलिस निरीक्षक ला.प्र.वि. जालना
मार्गदर्शक
मा.श्रीमती माधुरी कांगणे मॅडम,
पोलिस अधीक्षक ला.प्र.वी परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगर 9011092777
. श्री शशिकांत सिंगारे अपर पोलिस अधीक्षक ला. प्र. वी परिक्षेत्र छत्रपती 9923102205 संभाजीनगर
. सापळा पथक .
पोलीस हवालदार गजानन घायवट, श्रीनिवास गुडूर,पोलिस अंमलदार शिवलिंग खुळे,गजानन कांबळे,मनोहर भुतेकर,चालक पोना विठ्ठल कापसे ला.प्र.वी जालना.(टोल फ्री क्रमांक 1064)














