सिल्लोड (प्रतिनिधी ) तालुक्यातील टाकावस्ती त येथील छत्रपती संभाजी राजे राज्याभिषेक महोत्सवामध्ये आपला आपल्या कर्मावर विश्वास पाहिजे राशींवर नाही…कारण देव आपलं स्टेटस नाही तर कर्म पाहतो असे प्रतिपादन प्रा .सतीश उखर्डे यांनी यावेळी व्याख्यानात बोलताना केले.
छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेक सोहळा या निमित्ताने… पुढे बोलताना त्यांनी छत्रपती शिवरायांचा, छत्रपती संभाजीराजेंचा संघर्ष, आदर्श आणि संस्कार याबाबत स्वराज्याचा इतिहास उलगडला… आणि आई-वडिलांनी आपल्यासाठी केलेला त्यागही आपण कधीही विसरता कामा नये… कारण तेच आपले खरे ज्योतिषी असतात..आई घराचं मांगल्य असते, तर बाप घराच अस्तित्व असतो.. म्हणून आपली विद्या, ज्ञान,धन, शक्ती ही समाजासाठी खर्च केली तर आपण समाजात सन्मानास प्राप्त होऊ… हे सांगताना त्यांनी उपस्थितांची मने जिंकली…
भगवान डोईफोडे आणि गजानन डोईफोडे यांनी उपस्थितांना भोजनदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू आनेकर यांनी केले तर,सतीश आल्हाट यांनी आभार मानले.
















