शहापूर/ प्रतिनिधी :— शहापूर तालुक्यातील किन्हवली येथील रहिवासी व आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुकुंद उबाळे यांचे पुत्र शुभम मुकुंद उबाळे ( वय -२२) यांचे अल्पशा आजाराने काल पहाटे दोन वाजता दुःखद निधन झाले.शुभम या तरुणाच्या आकस्मिक निधनामुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून किन्हवली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरात शोक व्यक्त केला जात आहे.
शुभम गेल्या आठवड्यापासून आजारी असल्याने त्याच्यावर उल्हासनगर येथील मीरा हॉस्पिटल उपचार सुरू होते. उपचारादम्यान बुधवारी पहाटे दोन वाजता त्यांची प्राणज्योत मावळली.अत्यंत प्रेमळ व मनमिळाऊ स्वभाव असल्याने शुभम याचा मित्रपरिवार फार मोठा होता.अल्प वयात त्याच्या या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
शुभम यांच्या पश्चात आई वडील, एक मोठी बहीण,काका,काकू असा मोठा परिवार आहे. किन्हवली येथील स्मशानभूमीत त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.या शहापूर तालुक्यातील सर्व समाजातील राजकीय,सामाजिक, शैक्षणिक व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि पत्रकार,शुभमचे शालेय मित्र,आदी जण उपस्थित होते.
















