20 जानेवारी, 2026; अग्रगण्य कृषी-व्यवसाय कंपनी असलेल्या गोदरेज ऍग्रोव्हेट लिमिटेडने (गोदरेज ऍग्रोव्हेट) ग्रामीण शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी आणि शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (एमएसआरएलएम-उमेद) सोबत सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केल्याची घोषणा आज केली. 2026 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ (आयवायडब्ल्यूएफ 2026) म्हणून साजरे करण्याच्या संयुक्त राष्ट्राच्या घोषणेशी हे सहकार्य सुसंगत आहे. या अंतर्गत कृषी-अन्न प्रणालीमध्ये महिलांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकते आणि लैंगिक समानता दूर करण्यासाठी व उपजीविका मजबूत करण्यासाठी कृती करण्याचे आवाहन करते. तीन वर्षांच्या या भागीदारीचा उद्देश स्वयंसहायता गट (एसएचजी) आणि महिला शेतकऱ्यांना चांगल्या कृषी पद्धती (जीएपी) आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन (आयपीएम) स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करणे, शेतीची उत्पादकता सुधारणे आणि लवचिक उपजीविका निर्माण करणे हा आहे.
पहिल्या वर्षी हा कार्यक्रम कापूस पिकवणाऱ्या नऊ प्रमुख जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करेल; ज्यात नागपूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, परभणी, जळगाव, बीड, अकोला आणि नांदेड यांचा समावेश आहे. या अंतर्गत 5,000 पेक्षा जास्त महिला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून 50,000 एकरपेक्षा जास्त शेतजमीन समाविष्ट केली जाईल आणि प्रत्येक जिल्ह्यातील 100 बचत गटांना जोडले जाईल. पुढील तीन वर्षात ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात 5,000 पेक्षा जास्त बचत गटांना सहाय्य करण्यासाठी विस्तारली जाईल, तसेच कापसाव्यतिरिक्त मका आणि इतर पिकांपर्यंत या मोहिमेचा विस्तार करण्याची योजना आहे.
या सामंजस्य करारानुसार, जीएपी, आयपीएम आणि सुरक्षा पद्धतींवर प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यासाठी; शेतकरी क्षेत्र शाळा आणि प्रात्यक्षिक भूखंडांचे आयोजन करण्यासाठी; तसेच सुरक्षा किट वितरित करण्यासाठी गोदरेज ऍग्रोव्हेट एम.एस.आर.एल.एम.-उमेदसोबत काम करेल. एम.एस.आर.एल.एम.-उमेद आपल्या बचत गट आणि कृषी सखी नेटवर्कद्वारे संघटन तसेच समन्वयाची सोय करेल, तर गोदरेज ऍग्रोव्हेट या कार्यक्रमासाठी निधी पुरवेल आणि त्याची अंमलबजावणी करेल.
या भागीदारीवर भाष्य करताना, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे (एमएसआरएलएम-उमेद) मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. निलेश सागर (आयएएस) म्हणाले, “हा सामंजस्य करार तळागाळातील संस्थांना बळकट करून,त्यांच्या उपजीविकेमध्ये वाढ करून ग्रामीण महिलांना सक्षम करण्याच्या आमच्या ध्येयाशी सुसंगत आहे. आमच्या नेटवर्कचा आणि गोदरेज ऍग्रोव्हेटच्या कौशल्याचा उपयोग करून, आमच्या महिला शेतकऱ्यांना शेतीचे कार्यक्षमतेने व्यवस्थापन करण्यासाठी तसेच ग्रामीण महाराष्ट्राची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वैज्ञानिक पीक व्यवस्थापन पद्धतींनी सुसज्ज करणे, हा आमचा उद्देश आहे.”
गोदरेज ऍग्रोव्हेटचे सीईओ आणि एमडी सुनील कटारिया म्हणाले, “भारतीय शेती एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे, जिथे उत्पादकता, शाश्वतता आणि सर्वसमावेशकता यांची एकत्रित प्रगती होणे आवश्यक आहे. गोदरेज ऍग्रोव्हेटमध्ये आम्ही महिला शेतकऱ्यांना या परिवर्तनाचा केंद्रबिंदू मानतो. संशोधन आणि सामुदायिक सहभागाच्या समन्वयातून भारतीय शेतीत शाश्वत वाढ घडवून आणण्यासाठी कटिबद्ध असलेली एक संस्था म्हणून, आम्हाला MSRLM-UMED सोबत भागीदारी करताना आनंद होतो आहे. या भागीदारीद्वारे, आम्ही महिला शेतकऱ्यांना उच्च-परिणामकारक आणि व्यावहारिक कृषी तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्याचे ध्येय ठेवले आहे, जेणेकरून त्या अधिक चांगले उत्पादन मिळवू शकतील आणि त्यांच्या कुटुंबाचा उत्कर्ष करू शकतील. जबाबदारीने विस्तार करू शकतील असे आदर्श नमुने तयार करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”
या उपक्रमाच्या तांत्रिक पैलूवर प्रकाश टाकताना, गोदरेज ऍग्रोव्हेट लिमिटेडच्या पीक संरक्षण व्यवसायाचे सीईओ, राजवेलू एन.के. म्हणाले, “महाराष्ट्र हे भारतातील सर्वात महत्त्वाच्या कापूस उत्पादक राज्यांपैकी एक आहे आणि येथील शेतकऱ्यांसमोरील आव्हाने सोडवण्यासाठी विज्ञान-आधारित, प्रदेश-विशिष्ट दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. योग्य वेळी योग्य तोडगा काढणे महत्त्वाचे असल्याने, हे सहकार्य केवळ तत्काळ कृषीविषयक सुधारणांसाठीच नव्हे, तर एक अनुकरणीय, ज्ञान-आधारित पीक संरक्षण आराखडा तयार करण्यासाठी प्रेरणा म्हणून काम करेल, जो कालांतराने विविध भौगोलिक प्रदेशांमध्ये आणि वेगवेगळ्या पिकांसाठी लागू केला जाऊ शकतो.”
या सहकार्याच्या व्यापक परिणामांवर जोर देत, गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपचे ग्रुप प्रेसिडेंट – कॉर्पोरेट अफेअर्स, राकेश स्वामी म्हणाले, “सामान्य लोक आणि पर्यावरण हे आमच्या कोणत्याही उद्देशाच्या केंद्रस्थानी असतात. उद्योग आणि सार्वजनिक संस्था कशा प्रकारे एकत्र येऊन महत्त्वपूर्ण सामाजिक बदल घडवून आणू शकतात, याचे (एमएसआरएलएम-उमेद) सोबतचा हा उपक्रम म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे. महिला शेतकऱ्यांना सक्षम केल्याने केवळ कृषी उत्पादकताच वाढत नाही, तर ग्रामीण समाजही मजबूत होतो. याचा दीर्घकालीन परिणाम राज्य आणि देशावर होतो.”
महिला शेतकऱ्यांना वैज्ञानिक पद्धती अवलंबण्यास, मार्केट नेटवर्कपर्यंत पोहोचण्यास आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम करून, हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात उत्पादकता, उपजीविका आणि ग्रामीण लवचिकतेमध्ये चिरस्थायी सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करतो.
















