भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत दि. 21 जानेवारी बुधवार रोजी *बाल धमाल* 2026 या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बाल कलाकारांनी सादर केलेल्या नृत्याने व खळखळून हसवणाऱ्या नाटकांनी धमाल उडवून दिली. देशभक्तीपर गीते, गोंधळ, हिंदी, कव्वाली, मराठी चित्रपट गीतांवरील नृत्य व सामाजिक संदेश देणाऱ्या स्वच्छता अभियान विषयावरील विनोदी नाटिका यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले.तीन तास चाललेल्या या कार्यक्रमाने दानापूर पंचक्रोशीतील रसिकांचे मनोरंजन केले. कार्यक्रमाचे उद्घाटक भोकरदन पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक श्री किरण बिडवे है होते.व कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री एस.बी. नेव्हार सर गट समन्वयक प स भोकरदन होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी बी. एल. बडगे, चेअरमन श्री संतोष इंगळे ,ग्रामसेवक श्री.एस. बी. पगारे, केंद्र प्रमुख डी. पी. वाघ,श्री.आर एच सोनवणे श्री ईश्वर माणिकराव इंगळे श्री. रामेश्वर शर्मा श्री. गणेश बर्डे श्री. भगवान देठे श्री. एस पी शिरसाट श्री. प्रदीप सदानंशिव श्री. चंद्रशेखर देशमुख श्री. अमोल शिंदे, श्री भरत रगडे, श्री.सुनील गिरणारे श्री.चंद्रशेखर देशमुख, श्री. सुनील गिरणारे श्री. श्रीराम दळवी श्री.अभिजीत भारती, श्री.राम कुलकर्णी , श्री. टी.एस. लोखंडे इत्यादी उपस्थित होते यांच्यासह तालुक्यातील शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
सायंकाळी साडेसात वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमासाठी गावातील व परिसरातील रसिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणानंतर प्रचंड टाळ्या, जल्लोष दिसून येत होता.शाळेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड आनंद होता.बहारदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.संजय शास्त्री यांनी केले. प्रास्ताविक शाळेचे मुख्यध्यापक दिपक के. जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेलेतील शिक्षक वर्ग श्रीम. रुख़य्या शेख मैड़म, श्रीम.निकिता शिंदे, श्री. ज्ञानेश्वर शेवाळे , श्री.के.डी.दाडगे यांनी विशेष परिश्रम घेतले.तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठि शालेय व्यवस्थापन समितिने व गावातील होतकरू तरुणांनी परीश्रम घेतले.
















