छत्रपती संभाजीनगर, दि.२२ : गेल्या दोन वर्षात विद्यापीठ निधी तसेच पीएम उषा प्रकल्पांतर्गत सुमारे ७७ कोटींच्या पायाभूत सुविध उभारण्यात आल्या आहेत. तसेच नवीन शैक्षणिक धोरणानूसार अपेक्षीत गुणवत्ता व दर्जेदार संशोधनावर भर देण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी २४ जानेवारी २०२४ रोजी कुलगुरुपदाची सुत्रे घेतली. द्विवर्षपूर्तीनिमित्त मा.कुलगुरु यांनी गुरुवारी दि.२२ पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, संचालक डॉ.बी.एन.डोळे, डॉ.संजय शिंदे आदींची उपस्थिती होती. यावेळी मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी गेल्या दोन वर्षात झालेल्या विकास कामांची माहिती दिली. गेल्या दोन वर्षात विद्यापीठ निधीतून तसेच पीएम उषा प्रकल्पातंर्गत एकुण ७७ कोटी ११ लाख रुपयांची पायाभूत विकास कामे पूर्ण करण्यात आली आहेत. विद्यापीठाच्यावतीने सुरु असलेल्या कामांची माहिती
मा.कुलगुरु यांच्या कार्यकाळातील पायाभूत सुविधा, नविन इमारती व विस्तार
अ) विद्यापीठ निधीतून करण्यात आलेली कामे
१) अत्याधुनिक सुविधायुक्त नवीन रंगमंच
नाटयशास्त्र विभागाजवळ बाधकाम पूर्णत्वास
प्रेक्षक क्षमता – २ हजार ५००
खर्च – २ कोटी १५ लाख
२) विद्यार्थी वसतीगृह क्रमांक पाचव्या दुस-या मजल्याचे काम पुर्णत्वास
खर्च – २ कोटी १० लाख
प्रवेश क्षमता – ४०+४० – ८० विद्यार्थी
३) व्यवस्थापनशास्त्र विभागाच्या दुस-या मजल्याचे काम प्रगतीप्रथावर
खर्च – २ कोटी ५३ लाख
४) धाराशिव उपपरिसरात विद्यार्थ्यांयाठी नवीन वसतीगृह इमारतीचे काम पूर्ण
विद्यार्थी क्षमता – १००
खर्च – ६ कोटी ५० लाख
५) उपपरिसर ग्रंथालय इमारत अत्याधुनिक सुविधांसह काम पूर्ण
खर्च – ७ कोटी
६) उपपरिसर व्यवस्थापनशास्त्र विभागाची नूतन इमारत
खर्च – ८ कोटी
७) आंतरराष्ट्रीय दर्जाचा अॅथलेटिक्स सिंथेटिक ट्रँक
केंद्र शासनाकडून अनुदान ७ कोटी
विद्यापीठ निधीतून ८ कोटी – खर्च – १५ कोटी
अ) एकुण खर्च -४३ कोटी २८ लाख रुपये
ब) मा.कुलगुरु यांच्या कार्यकाळातील पीएम उषा प्रकल्पातंर्गत सुरु असलेली कामे
१) ’स्ट्रेस बस्टर रिक्रेशन फॅसिलीटी सेंटर’ नवीन इमारत – खर्च ९ कोटी ४८ लाख
२) ’सेंटर फॉर फोक अॅण्ड कल्चरल स्टडीज ऑफ मराठवाडा’ नूतन इमारत
प्रेक्षक क्षमता – २५० नाटयगृहाजवळ
खर्च – ६ कोटी ६२ लाख
३) ग्रंथालयाजवळ विद्यार्थ्यांसाठी भोजन कक्ष व अन्य सुविधा – खर्च ३ कोटी ७५ लाख
४) केमिकल टेक्नॉलॉजी विभागाच्या दुस-या मजल्याचे बांधकाम- खर्च ३ कोटी ७६ लाख
५) ’युनिक’च्या दुस-या मजल्याचे बांधकाम – खर्च – १ कोटी १६ लाख
६) मुलीच्या वस्तीगृहांची दुरुस्ती (पाच वसतिगृह) – खर्च ४ कोटी ४५ लाख
७) मुख्य परिसर व धाराशिव उपपरिसर येथील ५० विभागामध्ये ’स्मार्ट क्लासरुम’ची सुविधा – खर्च ४ कोटी ५० लाख
८) नवीन चार इलेक्ट्रीक बस – खर्च ४० लाख
ब) एकुण खर्च – ३४ कोटी १२ लाख
अ) ४३ कोटी २८ लाख
ब) ३४ कोटी १२ लाख
———————————————————————————
एकुण खर्च – ७७ कोटी ४० लाख
मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या कार्यकाळातील महत्वपूर्ण घडोमोडी
(सन २०२५)
• चार वर्षांपासून रखडलेली पीएच.डी.प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली.
• राज्यात सर्वाधिक फेलोशिप धारक संशोधक विद्यार्थी विद्यापीठ व संलग्नित संशोधन केंद्रात आहेत. केंद्र व राज्यशासनाच्या विविध एजन्सींच्यावतीने आजघडीला १,९८३ संशोधकांना फेलोशिप मिळत आहे.
• युवक महोत्सवात विद्यार्थी कलावंतांचा सहभाग वाढविण्यासाठी ११ वर्षांनंतर युवक महोत्सवाचे जिल्हास्तरावर आयोजन तसेच यंदापासून स्वतंत्र लोककला महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले.
• विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांच्या प्रबोधन व रंजनासाठी ’पाणवठा’ या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
• विद्यापीठाच्यावतीने संलग्नित ४१७ महाविद्यालयांचे अकॅडमिक व अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑडीज (ट्रिपल ए) करण्यात आले. यामध्ये ए, बी, सी,व नो ग्रेड या प्रमाणे मानाकंन देण्यात आले.
• पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेत नकलांचे प्रमाण कमी करण्यात यश मा.कुलगुरु यांनी अनेक परीक्षा केंद्राला अचानक भेट देऊन परीक्षेत शिस्त लावली.
• २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात प्रशिक्षक खेळाडुंचे मानधन वाढविण्यात आले तसेच खुली व्यायाम शाळा व क्रीडा विभागासाठी निधी वाढविण्यात आला.
• युवक महोत्सवाप्रमाणेचे ’आविष्कार’ स्पर्धांचेही जिल्हानिहाय आयोजन करण्यात आले. दोन्ही ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थी व मुलींची संख्या मोठया प्रमाणावर वाढली.
• दोन वर्षात तीन दीक्षांत समारंभाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. अत्यंत शिस्त व उत्कृष्ट नियोजनात हे महोत्सव घेण्यात आले.
• विद्यापीठातील चार विभागात इंडस्ट्री एब्सेडेड प्रोग्राम असे नाविण्यपूर्ण अभ्यासक्रम सुरु करण्यात आले.केंद्र शासनाच्या ’पीएम-उषा’ – मेरु प्रकल्पातंर्गत विद्यापीठास १०० कोटींचा निधी निधी मिळला आहे. या निधीतून पायाभूत सुविधा व इमारतींचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.
२. अन्य घटना – घडामोडी
विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडयाळी तासीका तत्वावरील नियुक्तीऐवजी १२५ कंत्राटी प्राध्यापकांची एकत्रीत वेतनावर ’टीइटी’द्वारे भरती
चार वर्षापासून रखडलेली ’पीएचडी’ (एनट्रन्स टेस्ट पेट) – पाच घेण्यात आली – संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात आली
प्राध्यापकांची पदोन्नती (कॅस) पाच वेळा मुलाखती, तसेच ’ शिक्षकेत्तर कर्मचा-यांची पदोन्नती’ प्रक्रिया गतीने राबविण्यात आली
’रजा रोखीकरण’ अंतर्गत कर्मचा-यांना सेवानिवृतीच्या दिवशी किमान चार लाखांचा निधी तर चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना निवृत्तीच्या दिवशीच संपूर्ण निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
पदव्यूत्तर परीक्षांसाठी केंद्राची संख्या कमी करुन पहिल्यांदाच विद्यापीठातील प्राध्यापकांची ११ भरारी पदके स्थापन
’इंडस्ट्री-युनिर्व्हसिटी’ यांच्यात समन्वयाच्या दृष्टीने विद्यापीठाने पहिले पाऊन उचलले. ’सीएमआयए’ समवेत देवाण-घेवाण सुरुवात करुन आजपर्यंत ५० हून अधिक सामंजस्य करार करण्यात आले.
कर्मचा-यांना आकस्मिक निधी उपलब्ध करुन देण्यासाठी ’सेवक कल्याण निधी’ची स्थापना करण्यात आली आहे.
युवक महोत्सवात सहभागी होणा-या कलावतांचा दैनंदिन भत्ता १२० वरुन ३०० रुपये करण्यात आला.
शिक्षक, कर्मचा-यांसाठी पहिल्यांदाच क्रीडा महोत्सव आयोजन करण्यात आले.
विद्यापीठाच्या क्रीडागणावर अद्यावत अॅथलेटिक्स सिन्थेटीक ट्रॅक मान्यता व कार्य १५ कोटी रुपर्य खर्चून अद्ययावत ट्रॅकची उभारणी अंतिम टप्प्यात आहे.
सन २०२४ वर्षातील घडामोडी, उपलब्धता
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वाटचालीत २०२४ हे वर्ष अत्यंत फलदायी व विद्यापीठाचा नावलौकिक उंचवणारे ठरले. मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी पदभार घेतलेल्या पहिल्या वर्षातच ’नॅक’ ए प्लस मानांकन, ’एनआयआरएफ – टॉप ५०’ विद्यापीठात नामांकन आणि ’पीएम उषा’ अंतर्गत शंभर कोटीचा भरघोस निधी यासह अनेक चांगल्या घटना घडामोडी २०२५ या वर्षात घडल्या.
सन २०२४ या मावळत्या वर्षात विद्यापीठाच्या स्थापनेला ६६ वर्षे पूर्ण झाली. एका वर्षांचा कालावधी तसा फार थोडाच असतो. मात्र या वर्षात विद्यापीठाच्या बाबतीत घडलेल्या घटना घडामोडींचा आढावा :
प्रधानमंत्री उच्चस्तर शिक्षा अभियान अर्थात ’पीएम उषा’ प्रकल्पांतर्गत १०० कोटींचा निधी फेब्रुवारी महिन्यात मंजूर झाला. शैक्षणिक व पायाभूत सुविधा यातून मोठया प्रमाणावर मिळणार आहे. तसेच याच काळात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासनास राज्यशासनातर्पेâ तीन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला.
जूनमध्ये पार पडलेल्या ६४ व्या दीक्षांत सोहळयात विद्यापीठाने पुढील वर्षात ’टॉप -५०’ मध्ये स्थान मिळवावे अशी अपेक्षा तत्कालीन कुलपती मा.रमेश बैस यांनी व्यक्त केली होती. तीन महिन्याच्या आतच विद्यापीठाने ’एनआयआरएफ’ अर्थात नॅशनल रँकिंग फेम वर्क अंतर्गत ऑगस्ट महिन्यात टॉप -५० राज्य विद्यापीठात स्थान मिळविले.
केमिकल टेक्नॉलॉजी हा ’एनबीए’ मानांकन मिळविणारा विद्यापीठातील पहिला विभाग ठरला. तसेच मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या ’अॅकडॅमिक अॅण्ड अॅडमिनि ऑडीट’ हा महत्वाकांक्षी प्रकल्प याच वर्षात पूर्ण झाला. विद्यापीठ मुख्य परिसर व धाराशिव उपपरिसर येथील ’ट्रिपल ए’ प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
वर्षातील सर्वात मोठी घटना म्हणजे ’नॅक ए प्लस’ मानांकन मिळाले. सुरुवातीला बी प्लस, दोन वेळा अ दर्जा तर चौथ्या फेरीत ३.३८ सीजीपीएसह आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी विद्यापीठाने केली. मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी पदभार घेताच पहिल्या संकल्प ’नॅक’ मानांकनाचा ठरविला आणि वर्ष अखेरपर्यंत तो सिध्दीसही नेला.
या शिवाय गेल्या वर्षभरातील महत्वपूर्ण घटना – घडामोडी पुढीलप्रमाणे :-
एकाच वर्षात डॉ.प्रमोद येवले, डॉ.सुरेश गोसावी व डॉ.विजय फुलारी असे तीन कुलगुरु लाभले.
चार वर्षापासून रखडेलेली ’पीएचडी एंन्ट्रन्स टेस्ट’ अर्थात ’पेट-पाच’ घेण्यात आली.
पा्रध्यापकांसाठीचे सेवा शिस्तीचे परिनियम स्टॅटयूट तयार करुन अधिसभेत मंजूर करण्यात आले.
राज्यस्तरीय ’इंद्रधनुष्य’ महोत्सवाचे यशस्वी आयोजन फेब्रुवारीत करण्यात आले.
जानेवारी व डिसेंबर असा वर्षात दोनदा आविष्कार महोत्सव घेण्यात आला.
विद्यापीठाच्या इतिहासाता पहिल्यांदाच १२० कंत्राटी प्राध्यापकांची भरती करण्यात आली.
विद्यापीठाला शैक्षणिक व प्रशासकीय शिस्त लावण्यात मा.कुलगुरु यांना यश आले.
सहा वर्षानंतर केंद्रीय युवा महोत्सवात विद्यापीठाने ’चॅम्पियनशिप जिंकली’
’इंडस्ट्री-युनिर्व्हसिटी’ यांच्यात समन्वयाच्या दृष्टीने विद्यापीठाने पहिले पाऊल उचलले. ’सीएमआयए’ समवेत देवाण- घेवाणीस सुरुवात. अशा प्रकारे चालू शैक्षणिक वर्ष विद्यापीठाचा नावलौकिक उंचावणारे ठरले.
(सोबत फोटो)
१) मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
२) पाचशे विद्यार्थ्यांची एकाच वेळी ऑनलाईन परीक्षा घेता येईल अशा ’डिजिटल ट्रन्सकॉर्मेशन सेंटर’च्या इमारतीचे काम प्रगतीपथावर आहे.
३) विद्यार्थ्यांसाठी भोजन कक्ष उभारणीचे काम सुरु आहे.
















