आज दिनांक 22/01/2026 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्न, अजिंठा शिक्षण संस्था संचलित पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालय छ. संभाजी नगर, यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभाग वतीने . ‘जलसंधारण पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन आणि पडीक जमीन विकासासाठी युवा’ या भारत सरकारच्या थीम नुसार सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिर मौजे भिंदोन ता. जि. छत्रपती संभाजीनगर, या गावात दिनांक: 22 ते 28 जानेवारी 2026 या कालावधीत संपन्न होणाऱ्या शिबिराचे उद्घाटन अजिंठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रंगनाथ बाबुरावजी काळे यांच्या हस्ते संपन्न झाले. या. कार्यक्रमासाठी अध्यक्षीय समारोप करताना मा. रंगनाथ काळे यांनी ग्रामीण भागातील विकासामध्ये तरुणांचे योगदान महत्त्वाचे आहे. युवकांना ग्रामीण भागातील समस्याचे जाणीव असावी खेड्यातील सांडपाणी नियोजन, कचरा व्यवस्थापन, तसेच वृक्षारोपण, प्लॅस्टिकच्या वापराचे होणारे दुष्परिणाम, जमिनीचे मोठ्या प्रमाणात होणारे प्रदूषण या समस्यांनी जनजीवन ढवळून निघत असताना युवकांनी सजक राहून या समस्यांवर मात करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे याविषयी विद्यार्थ्यांना त्यांनी जागृत केले. तसेच मागील अनेक वर्षांमध्ये ग्रामीण भागातील शैक्षणिक सामाजिक तसेच पर्यावरणाच्या अनुषंगाने जो काही विकास झाला आहे याचा आपल्या भाषणामध्ये आढावा घेत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून गावाच्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी तसेच स्वच्छतेची जनजागृती सामान्य जनतेपर्यंत झाली पाहिजे व यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाधिकारी यांनी मेहनत घ्यावी व लोकांना मध्ये जनजागृती करावी असे मार्गदर्शन देखील पुढे बोलताना केले. तसेच युवकांनी देश विकासात योगदान द्यावे .गाडगेबाबा यांचा स्वच्छतेचा संदेश समोर ठेवून स्वच्छ घर सुंदर देश निर्माण करावा . या कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पंडित नलावडे यांनी केले . त्यांनी प्रस्ताविका मध्ये सात दिवसांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाने करावयाच्या कामाचे नियोजन व विविध ग्रामीण स्तरावर समस्या सांगून सात दिवसांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभाग, काय काम करणार आहे याची माहिती दिली. तसेच या कार्यक्रमांमध्ये जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. कैलास गायकवाड यांनी देखील विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण असे विचार आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचाराची विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच स्वामी विवेकानंद यांनी विद्यार्थी जीवनामध्ये जे काही आचरण केले व नियमाचे पालन केले त्यामुळे त्यांचे जीवनात अतिशय यशस्वीरित्या त्यांचं कार्य आणि विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यार्थी जीवनामध्ये नियमाचे पालन शिस्तपालन आणि सामाजिक कार्यामध्ये हिरेरीने सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. या मंचावर उपस्थित राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. शिल्पा जिवरग तसेच श्री. महेश शिंदे (ग्रामपंचायत भि दोन) याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद उपस्थित होते होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. गोविंद फड यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. लक्ष्मीनारायण कुरपटवार यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी राष्ट्रीय सेवक राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते















