23 जानेवारी 2026 : १८३२ पासूनचा समृद्ध वारसा जपणारा भारतातील एक अग्रगण्य दागिन्यांचा ब्रँड ‘पीएनजी ज्वेलर्स’ने बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता रणबीर कपूर याची नवा ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. परंपरेची जाण, आकर्षकता आणि विश्वासार्हता यांचा सहज संगम असलेला रणबीर कपूर ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या प्रवासातील एक रोमांचक नवा अध्याय ठरणार असून, यामुळे ब्रँडची राष्ट्रीय पातळीवरील उपस्थिती अधिक भक्कम करणार आहे.
महाराष्ट्राच्या मातीतून सुरू झालेले आणि आज भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर आत्मविश्वासाने विस्तार करत असलेले ‘पीएनजी ज्वेलर्स’ डॉ. सौरभ गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. रणबीर कपूरसोबतची ही भागीदारी ब्रँडच्या उत्क्रांतीचे प्रतीक असून, विश्वास, कारागिरी आणि वारसा या मूल्यांशी असलेली नाळ अधिक दृढ करते. बॉलिवूडच्या दिग्गज कपूर घराण्याची परंपरा पुढे नेत, रणबीर कपूरने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. रणबीरचा प्रचंड चाहतावर्ग आणि सिनेसृष्टीतील वारसा ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या विविध वयोगटांतील ग्राहकांपर्यंत पोहोच वाढवण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
हा करार जानेवारी २०२६ पासून सुरू होणार असून, रणबीर कपूर विद्यमान ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून ‘पीएनजी ज्वेलर्स’चे प्रतिनिधित्व करणार आहे. या सहकार्याचा मुख्य उद्देश राष्ट्रीय स्तरावर ब्रँडची दृश्यमानता वाढवणे, विश्वास अधिक दृढ करणे आणि एंडोर्समेंट्स, अॅडव्होकेसी तसेच ब्रँड-नेतृत्वाखालील उपक्रमांद्वारे ‘पीएनजी ज्वेलर्स’चा वारसा अधिक व्यापकपणे पोहोचवणे हा आहे. या भागीदारीसोबत कोणत्याही विशिष्ट कलेक्शनचा लॉन्च नसला, तरी हा करार ब्रँडच्या दीर्घकालीन राष्ट्रीय स्तरावर रिटेल विस्तार धोरणाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
या सहकार्याविषयी बोलताना अभिनेता रणबीर कपूर म्हणाला,
“पीएनजी ज्वेलर्स हा पिढ्यान्पिढ्यांचा वारसा जपणारा आणि विश्वास व मूल्यांवर उभा असलेला ब्रँड आहे, ज्याचा मी मनापासून आदर करतो. परंपरेचा सन्मान करत भविष्याकडे आत्मविश्वासाने वाटचाल करणाऱ्या या ब्रँडचा भाग होणे माझ्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे आणि या प्रवासाचा मी अभिमानाने भाग बनत आहे.”
या भागीदारीबद्दल आपला आनंद व्यक्त करताना ‘पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले,
“रणबीर कपूर यांचे व्यक्तिमत्त्व परंपरेचा आदर राखत आधुनिकतेकडे आत्मविश्वासाने वाटचाल करणारे आहे. जसा पीएनजी ज्वेलर्सने आपल्या मुळांशी निष्ठा राखत काळानुसार स्वतःला विकसित केले आहे, तसेच रणबीर कपूरने एका आयकॉनिक वारशाला प्रामाणिकपणे आणि सुसंगततेने पुढे नेले आहे. ही भागीदारी केवळ दृश्यमानतेपुरती मर्यादित नसून, समान मूल्ये आणि भविष्याकडे पाहणाऱ्या सामायिक दृष्टीकोनावर आधारित आहे.”
या सहकार्याद्वारे पीएनजी ज्वेलर्स आपली ओळख विश्वासाचे प्रतीक, विकसित होत असलेला वारसा आणि कालातीत सौंदर्य म्हणून अधिक मजबूत करत असून, परंपरा आणि आधुनिक भारत यांच्यातील एक सशक्त नाते निर्माण करत आहे.
















