श्रीरामांच्या प्राण प्रतिष्ठे चा 22 जानेवारी हा वर्धापन दिनाचे औचित्य साधत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सिल्लोड जिल्हा (गतीविधी )च्या वती व अभिनव प्रतिष्ठानच्या वतीने कोविदार या देव वृक्षाचे आज अजिंठा येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिराच्या परिसरात इतिहास संशोधक विजय पगारे, डॉ संतोष पाटील, राजू देशमुख, प्रसाद झलवार, विजय झलवार, मुकेश पुरे, सुजित गुप्ता, विकास गुप्ता, पुरण सिंग तोमर, ई उपस्थितीत रोपण करण्यात आले आहे. देशात सर्व प्रथम या निमित्ताने सिल्लोड संघाच्या माध्यमातून डॉ. संतोष पाटील जिल्हाभर हे रोपण करत आहे. अयोध्या येथील श्री राम मंदिरावर उभारण्यात आलेल्या धर्म ध्वजा वर हा राजवृक्ष चित्रित केलेला आहे. या विषयी शास्त्रीय माहिती असलेली फ्रेम सूर्यकिरण अर्बन बँकेचे व अभिनव प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण पा. पवार यांच्या वतीने मंदिरात लावण्यात आली आहे.
















