छत्रपती संभाजीनगर, दि. २३: मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात शनिवारी (दि. २४) दुपारी १२ वाजता कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. मराठी विभागाच्या सभागृहात निमंत्रित कवींचे हे संमेलन होणार आहे.
या कविसंमेलनात माजालना येथील प्रख्यात कवयित्री डॉ.संजीवनी तडेगावकर, जलगाव येथील प्रभाकर साळेगावकर, छत्रपती संभाजीनगर येथील मृणाल देशपांडे, डाॅ.विष्णू सुरासे तसेच येवला येथील रामप्रसाद वाव्हळ यांचा समावेश आहे. कविसंमेलनाला रसिकांनी उपस्थित राहावे , असे आवाहन विभाग प्रमुख डाॅ.दासू वैद्य यांनी केले आहे.
















