छत्रपती संभाजीनगर, दि.२३ :डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी करण्यात आली. मुख्य इमारतीत शुक्रवारी (दि.२३) सकाळी हा कार्यक्रम झाला.
यावेळी विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. महेंद्र शिरसाठ, रभारी कुलसचिव डॉ गणेश मंझा, विद्यार्थी विकास संचालक डॉ.कैलास अंभुरे, परीक्षा मंडळ संचालक डॉ. बी एन डोळे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी डॉ.संजय कवडे, डॉ.संजय शिंदे, माधव वागतकार आदींसह कर्मचारी उपस्थित होते.
मतदान जागृती दिनानिमित्त शपथ
यावेळी राष्ट्रीय मतदार जागृती दिनानिमित्त उपस्थित सर्वाना शपथ देण्यात आली.
















