मास्टर माईंड इंग्लिश मिडियम हायस्कूल,नवी सांगवी,पुणे येथे २६ जानेवारी २०२६ रोजी ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साह आणि देशभक्ती पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
सकाळी ठीक ७:३० वाजता शाळेच्या प्रांगणात प्रमुख पाहुणे अमोल नांदेकर (पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा),माधवीताई राजापुरे (मा.नगरसेविका,नवी सांगवी), संजय मराठे (समाजसेवक),प्रशांत कडलग (समाजसेवक),सुनील बिरारी (समाजसेवक),रमेश चौधरी (समाजसेवक) व शाळेच्या मुख्याध्यापिका राजपाल सहोता यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला.ध्वजारोहणानंतर सर्वांनी राष्ट्रगीत गाऊन तिरंग्याला मानवंदना दिली त्यानंतर इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी झेंडा गीत, महाराष्ट्र गीत व देशभक्तीपर गीत सादर केले.त्यानंतर कुमारी हर्षाली वाघ (शाळा विद्यार्थी प्रतिनिधी) हिने राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सर्व विद्यार्थ्यांकडून वाचन करून घेतले.त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी संपूर्ण देश साक्षर करण्याबाबत ‘साक्षरता प्रतिज्ञा’ घेतली. इयत्ता पहिलीतील विद्यार्थी कुमार झेंडे व हर्षाली वाघ यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने भाषणे केली. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये शिशु वर्गातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते व नृत्य सादर केली तर इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी विविध कवायतींचे प्रकार सादर केले इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी लेझीम तर इयत्ता सातवी ते दहावीच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर नृत्यांचे सादरीकरण केले. शिशुवर्गातील म्हणजेच नर्सरी,एलकेजी, युकेजी विद्यार्थ्यांनीही प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांमध्ये अतिशय उत्साहाने सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या सहशिक्षिका शांभवी वर्टी यांनी केले.
त्याप्रसंगी संजय मराठे यांनी शाळेमध्ये दरवर्षी विद्यार्थ्यांना संचलन,देशभक्ती गीते सादर करणे,देशभक्तीच्या गीतांवर नृत्य करणे,पारंपारिक असा ढोल लेझीम खेळखेळून दाखवणे अशा विविध प्रकारच्या प्रेरणादायी कार्यक्रमांचे शाळेने उत्कृष्ट प्रकारचे नियोजन केल्याबद्दल मी या शाळेचे भरभरून कौतुक केले.
















