जालना दिनांक 26 jan 26 —– जालना तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहंकार देऊळगाव येथे भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस गावातून प्रभात फेरी काढण्यात आली . शालेय विद्यार्थ्यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाचा विजय असो, भारत माता की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, महात्मा गांधी की जय, भारतीय संविधानाचा विजय असो अशा घोषणा दिल्या. शाळेत संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री गजानन पिराजी खरात हे होते ,तर प्रमुख पाहुणे म्हणून अहंकार देऊळगाव चे सरपंच देविदास सोमधाने, गणेश डोईफोडे, नंदू खरात, सुखदेव खरात ,मोकिंदा खरात, सुरेश खरात ,अशोक सोमधाने, अमोल खरात, भागवत मस्के ,रघुनाथ ढगे परमेश्वर गंडाळ ,गोविंद खरात ,राजू खरात ,राहुल खरात,संजय खरात, पिराजी खरात ,श्रीराम जगधने ,बद्रीनाथ वाडेकर, राजू वाडेकर ,अमोल जगधने, कमलाकर दुधारे ,भिकूलाल खरात ,कचरू खरात,अरुण खरात, बाबासाहेब गवई ,सखाहरी सोमधाने, पोलीस पाटील कपिल मस्के, ग्रामसेवक राहुल सातपुते यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज ,भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपिता महात्मा गांधी , यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी श्री पिराजी खरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त मराठी ,इंग्रजी, हिंदी या भाषेत मनोगत व्यक्त केलीत. शाळेतील विद्यार्थ्यांनी भक्ती पर गीतावर कवायत सादर करून उपस्थित मने जिंकली. 26 जानेवारी निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण सुद्धा यावेळी करण्यात आले .यावेळी विजेत्या स्पर्धकांना शाळेचे प्रमाणपत्र तसेच रोख रक्कम शालेय साहित्य देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. श्री देविदास सोमधाने यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एक पाण्याची मोठी टाकी तसेच नळ फिटिंग करून देण्याचे आश्वासन यावेळी दिले .यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी तथा एलआयसी अभिकर्ता श्री सुरेश खरात यांनी शाळेला पाच हजार रुपये, श्री अशोक सोमधाने यांनी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी पारितोषिक म्हणून अडीच हजार रुपये, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री गजानन पिराजी खरात यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य एक रजिस्टर, पेन ,शाळेसाठी एक भोंगा तसेच विद्यार्थ्यांना मिठाई साठी 5000 हजार दिलेत. तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य राजू खरात, श्री गोविंद खरात, अमोल जगधने, बाबासाहेब गवई यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी प्रत्येकी दोन मोठ्या चटया भेट दिल्यात. तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्या श्रीमती वर्षा कमलाकर दुधारे यांनी विद्यार्थ्यांना नाश्त्याची व्यवस्था केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस. झेड. गजभिये यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना व गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना भारतीय प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व समजावून देऊन शाळेला मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जी.एफ. उगले यांनी केले. तर उपस्थितांचे आभार श्री. पी. पी मानसुरे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक श्री जे .जी.शेळके, श्रीमती व्ही .यू .गायकवाड अंगणवाडी ताई श्रीमती कावेरी इप्पर ,आशाताई श्रीमती संगीता पगडे, अंगणवाडी मदतनीस श्रीमती सुनिता खरात, श्रीमती शांताबाई मस्के ग्रामपंचायत कर्मचारी श्री सदानंद शिंदे, श्री दीपक मस्के, श्री अनिल गवई यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी या कार्यक्रमास गावातील शिक्षण प्रेमी नागरिक, युवक व बहुसंख्य महिला बचत गटाच्या महिलांची उपस्थिती होती.
















