बुलडाणा,(प्रतिनिधी )- बुलढाणा जिल्ह्यातील मुळ रहिवासी असलेल्या पण मुंबई येथे नोकरीच्या व इतरकामसाठी गेलेल्या व मुंबई येथे स्थायिक झालेल्या विचारवंतांनी दादर मुंबई येथे एकत्र येऊन ज्या भूमित जन्मलो त्या भूमिने आपणास हे वैभव प्राप्त करून दिले त्याची परतफेड करण्यासाठी आपले काही कर्तव्य असले पाहिजे त्या जिल्ह्यातील समाजाच काही देण घेणे असते हा विचार समोर ठेवून “बुलढाणा जिल्हा विकास संघर्ष समिती, मुंबई” ची स्थापना केली आहे.
या समितीने 2 ( दोन ) उदधिषटये-ध्येय धोरणे प्राप्त करण्यासाठी या समितीची स्थापना केली आहे.
राजमाता जिजाऊ यांचे जन्म स्थान “सिंदखेड राजा” महाराष्ट्र शासनाने 1980 च्या दरम्यान पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले. पंरतु अद्याप या ऐतिहासिक “सिंदखेड राजा”नगरीकडे पर्यटक पाहिजे त्या संखेने येत नाहीत जास्तीत जास्त पर्यटक या ठिकाणी आकर्षिला जावा यासाठी येथील सर्व ऐतिहासिक स्थळांची अद्ययावत मशीनद्वारे डागडुगजी करुन सभोवताली आकर्षक असे गार्डनस,लाईटिंग ची झगमगाहट, सांऊड सिसटमली- फलड लाईट शो – Screen द्वारे स्थळांची इतंभुत माहीती देणे, चांदणी तलाव तसेच मोती तलावांवर रोपवेची निर्मिती करणे.तलावावंर पर्यटकांसाठी बोटींगची अथवा बोट सफर ची व्यवस्था करणे.या सर्व मागण्यांसाठी विविध मार्गांचा अवलंब करून शासनाकडे पाठपुरावा करणे.
तसेच जागतिक कीर्तिचे व ऐतिहासिक पर्यटन स्थळ “लोणार” या स्थळाकडे देखील पर्यटक जास्तीत जास्त प्रमाणात आकर्षीत व्हावा यासाठी विविध मार्गांचा अवलंब करून शासनाचे लक्ष वेधणे ,पाठपुरावा करणे.
विदर्भातील बुलढाणा जिल्हा हा कायमचा मागासलेला जिल्हा आहे . पश्चिम विदर्भातील या जिल्ह्याचा खूप मोठा भाग (90%) अद्याप रेल्वे लाईन नसल्यामुळे आर्थिक आणि सामाजिक दृष्टया खूप मागासलेला राहीला आहे. म्हणजेच जागतिक दर्जाची- कीर्तिची दोन ठिकाणे जवळ असुन सुद्धा दुर्लक्षित, उपेक्षित राहीलेली आहेत. किंबहुना उपेक्षित ठेवली गेली आहेत. याची कोणीही तसदी वा दखल घेत नाहीत. कारण राजकिय दूरदृष्टीचा अभाव अथवा राजकिय महत्वाकांक्षा नसणे.त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील हा भाग रेल्वे लाईनने जोडला गेलेला नाही. रेलवे लाईन नसल्या कारणे अद्याप हा भाग मागासलेला राहीला. या भागातील नागरिकांची गेल्या अनेक वर्षांपासुनच्या वरिल व खालील मागण्या शासनाने शीघ्रगतीने लवकरात लवकर पुर्ण करणे आवश्यक आहे
रेल्वे मार्ग जालना ते नागपुर व्हाया “सिंदखेड राजा”,राहेरी, किनगांव राजा, दुसरबीड ,लोणार* , मेहकर,डोणगांव मार्गे पुढे नागपुर करणे आवश्यक आहे.
जालना ते खामगांव व्हाया सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, चिखली, खामगांव असा ही रेल्वे मार्ग करणे आवश्यक आहे.यामुळे मॅाजिजाऊंचे जन्म स्थळ ” सिंदखेड राजा रेल्वे स्टेशन” रेल्वे जंक्शन होईल आणि विविध राज्यातुन पर्यटकांचे लोंढे सतत या भागास भेट देऊ शकतील यामुळे येथील नागरिकांच्या जीवनात व बुलडाणा जिल्ह्याच्या विकासाला अनेक अमुलाग्र असे बदल घडून येतील.या अत्यंत आवश्यक आणि महत्वपूर्ण अशा दोन मागण्या शासना कडून पुर्ण करून घेण्यासाठी, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुलढाणा जिल्हा विकास संघर्ष समिती मुंबईचे कार्यकारी मंडळ अथवा सूकाणू समितीची स्थापणा करण्यात आली व्ही.जी.जाधव जनरल मॅनेजर कॅाटन कार्पेार्शन ॲाफ इंडीया, यु.ओ.बोदडे डेप्यूटी कमिश्नर ॲाफ पोलीस तथा सोशल वर्कर,एच.बी.तायडे जॅाईंट सेक्रेटरी मंत्रालय तथा सोशल वर्कर, डॅा.व्ही.बी. तायडे प्राचार्य सिडनेहॅम कॅालेज मुंबई, एन.बी.म्हस्के अधिक्षक सेंट्रल एक्साईज ॲन्ड कस्टम, डॅा. डॅा.डि.आर.इंगळे प्रो.आयटीआय कॅालेज,बी.बी.पवार प्राचार्य, ॲडव्होकेट वामन मोरे,ई.एम.शिंद शिक्षण अधिकारी, सुरेश जाधव नायब तहसीलदार मुंबई, आर.आर.भालेराव अधिकारी इंडीयन पोस्ट, दिलीप भालेराव शिक्षक, जॅाईंट कमिशनर ईमकम टॅक्स एम.जे. बोर्डे हे कार्यकारी मंडळ घोषित करून सर्वानी सहमती देऊन जाहीर केले.यावेळी बहुसंख्येने बुलडाणा जिल्ह्यातील भूमीपूत्र हजर होते. यावेळी त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना विनंती केली की,आपण देखील या वरील दोन मागण्यासाठी शासना कडे निवेदने पाठवून शासनाचे लक्ष वेधण्याचे आवाहन व नम्र विनंती याा समितीने बुलढाणा जिल्ह्यातील इतरत्र जिल्ह्यात स्थाईक झालेल्या नगरीकांनी आपआपल्या परिने आपल्या मायभूमीच्या विकासासाठी प्रयत्न करावे असे आवाहन या समीतीने केले.
















