शिक्षणाचे बाजारीकरण वेगाने सुरु असतांना नांदेड एज्युकेशन सोसायटीकडून मूल्याधिष्ठीत शिक्षणातून समाजमन घडविण्याचे होत असलेले प्रयत्न प्रेरणादायी असल्याचे मत नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या तथा सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केले.
भारतीय स्वातंत्र्य आंदोलन व हैद्राबाद मुक्ती संग्रामातील स्वातंत्रता सैनानी प.पु.स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त मागील वर्षभरापासून सुरु असलेल्या अमृत महोत्सवी कार्यक्रमांचा समारोप आज शनिवार दि.24 रोजी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर व पुणे येथील आरोग्य सेनेचे संस्थापक डॉ.अभिजित वैद्य, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.मनोहर चासकर, संस्थेच्या सचिव प्रा. श्यामल पत्की, सहसचिव अँड.प्रफुल्ल अग्रवाल, सायन्स कॉलेज विकास समितीचे अध्यक्ष दीपनाथ पत्की, पीपल्स हायस्कूल शालेय समितीचे अध्यक्ष नौनिहालसिंघ जहागिरदार, पीपल्स कॉलेज शालेय समितीचे अध्यक्ष अँड.कॉ.प्रदीप नागापूरकर, अँड. चिरंजीलाल दागडीया, प्राचार्य डॉ.लक्ष्मण शिंदे, प्रभारी प्राचार्य शिवशंकर भानेगावकर यांच्या उपस्थितीत तर नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी खा.डॉ.व्यंकटेश काब्दे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी बोलतांना सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर म्हणाल्या की, शिक्षणाचे खाजगीकरण मोठ्या वेगाने सुरु आहे. विद्यार्थी संख्या कमी असल्याचे कारण देवून सरकारी शाळा बंद केल्या जात आहेत. राज्यघटनेत शिक्षण हा मुलभूत अधिकार मानला गेला असला तरी सध्याची शासन व्यवस्था वेगाने शिक्षणाचे बाजारीकरण करीत असल्याचा
















