छत्रपती संभाजीनगर: इटखेडा पैठण रोड येथील अग्रसेन विद्या मंदिर शाळेत ७७ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करणाऱ्या विविध कार्यक्रमाने उत्साह व जल्लोषात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास सन्माननीय अतिथी म्हणून सुनीलजी बनारसीदासजी गोयल (पोलाद स्टील, जालना) हे लाभले होते तसेच शाळा समितीचे विद्यमान अध्यक्ष सच्चानंदजी अग्रवाल, उपाध्यक्ष गोकुळजी अग्रवाल, सचिव निधिजी अग्रवाल, कोषाध्यक्ष पंकजजी अग्रवाल, अग्रवाल सभा अध्यक्ष कुंजबिहारीजी अग्रवाल तसेच शाळा समितीच्या इतर सदस्यांच्या उपस्थितीत ध्वज फडकविण्यात आला. संगीत शिक्षक नेहा नेरळकर, सागर नागापूरकर व आस्था नागापूरकर यांच्या बरोबर शालेय विद्यार्थ्यांनी झेंडा गीताद्वारे राष्ट्रध्वजास स्वरबद्ध मानवंदना दिली त्यानंतर एनसीसी पथकाने मान्यवरांना मानवंदना दिली यासाठी विद्यार्थ्यांना सौरभ जोशी व दीपा देहाडे यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रसंगी शाळेच्या मैदानात माता सरस्वती, महाराजा अग्रसेन व भारतमातेच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. शालेय विद्यार्थी आर्यन तायडे याने प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. मान्यवर आतिथींच्या सत्कारानंतर शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा महोत्सवामध्ये ज्या १६ प्रकारच्या सांधिक व वैयक्तिक क्रीडांचे आयोजन करण्यात आले होते त्यामधील विजेते पद पटकविणाऱ्या खेळाडूंचा स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन त्यांच्या सत्कार करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनानिमित्ताने आयोजित रंगारंग कार्यक्रमात शाळेच्या नृत्य शिक्षिका दिव्या गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. नाट्यविभाग प्रमुख आकाश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी खेळातूनही जीवनाचे ध्येय गाठून यशस्वी होता येते या विषयाला अनुसरून नाटिका सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. क्रीडा शिक्षक कु. सोनी खरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिक लाठीकाठीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी दर्शविले. तसेच अनोख्या सामुहिक कवायतीद्वारे एकतेचा संदेश देऊन विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची प्रशंसा मिळवली.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये कार्यतत्पर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना मान्यवरांनी कलागुणांचे कौतुक करून त्यातील सातत्य कठोर परिश्रमाने टिकवता येईल हे उदाहरणासह स्पष्ट केले व देशाच्या अखंडतेसाठी कटीबद्ध राहण्याची प्रतिज्ञा घेण्यास सांगितले. शाळा समितीच्या सचिव निधीजी अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देतांना त्यांच्या खेळाडू वृत्तींना जोपासण्यासाठी सोपे मर्म सांगितले.
कार्यक्रमाच्या शिस्तबद्ध आयोजनासाठी शाळेचे प्राचार्य संतोष कुमार करवा व उपप्राचार्या मयुरी लोगलवार, अधीक्षक अजय सोनुने यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या संपन्नतेसाठी सर्व विभागांचे विभाग प्रमुख, कार्यक्रमाचे प्रमुख विक्रम शर्मा, प्रशांत अग्रवाल, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अविरत परिश्रम घेतले. शिक्षिका वैशाली खरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेदश्री हाक्के व आर्या भालेराव यांनी तर आभार प्रदर्शन अवनी शिराढोणकर व अवनी जाधव यांनी केले.
















