माझ्या प्रिय देश बांधवानो,शोषित आणि वंचित समुदायातील माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि या नवजात राष्ट्राच्या नागरिकांनो जागे व्हा! सविधान, ही तुमची ढाल आहे पण ती धरून ठेवण्याची ताकद तुम्ही एकवटली पाहिजे. आज मी इथे उभा असताना माझ्या हातात असलेले हे भारतीय संविधान केवळ पानाचा गठ्ठा नाही. ते माझ्या घामाने,माझ्या रक्ताने, माझ्या निद्रानाशाच्या रात्रीने आणि हजार वर्षापासून माझ्या समाजाच्या अश्रूचे सार आहे.आज माझे हृदय आनंदाने नाही तर चिंता आणि जबाबदारीच्या भावनेने देखील भरलेले आहे.मी तुम्हाला खुश करण्यासाठी गोड शब्द बोलणार नाही. आज मी तुम्हाला झोपी जाण्यासाठी लोरी म्हणायला आलो नाही .उलट तुम्हाला जागे करायला आलो आहे. कारण आपल्या समाजाने शतकानुशतकेची झोप अनुभवली आहे. त्याची किंमत आपण आपल्या गुलामगिरीतून चुकवली आहे. भारतीय संविधान तयार करण्याच्या वेदना संघर्षाशी आज आपण आनंदी आहोत की आपल्याला हक्क मिळाले आहेत आपण आता मुक्त आहोत याचे कौतुक करणार आहोत पण स्वातंत्र्याचा हा दस्तऐवज,समानतेचा दस्तऐवज तयार करण्यासाठी तयार करण्यासाठी मला कोणत्या आगीतून जावे लागले हे तुम्हाला माहित आहे का ?
जेव्हा मी संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवडून आलो तेव्हा मी ती जबाबदारी स्वीकारली. पण मला माहित होते.तो काट्यांचा मुकुट होता मी आजारी होतो. माझे शरीर कमकुवत होत होते. डॉक्टरांनी मला विश्रांती घ्यायचा सल्ला दिला. माझी दृष्टी कमकुवत होत होती. मधुमेह माझ्या शरीराला आतून पोकळ करत होता .पण माझ्यासमोर फक्त तुमची प्रतिमा होती. ते म्हणजे गावातील विहिरीचे पाणी पिण्यासाठी मारहाण झालेल्या त्या पिढीत व्यक्तीची, जिच्या मुलाला वर्गाबाहेर अभ्यासासाठी बसवण्यात आले होते.मी रात्रभर जागा राहतो जेव्हा संपूर्ण दिल्ली झोपली होती .तेव्हा माझा दिवा जळत राही.
*माझ्या मनात फक्त एकच भीती होती. जर मी आज चूक केली, जर आज माझी लेखणी थांबली किंवा आज मी एक चुकीचा शब्द लिहिला तर माझ्या भावी पिढ्या पुन्हा एकदा गुलामगिरीच्या साखळी दंडात जखडल्या जातील.
माझा अपमान झाला .मला देशद्रोही म्हटले गेले. मी केलेल्या प्रत्येक प्रस्तावावर बोटे उचलली गेली.मला प्रत्येक पावलावर थांबवले गेले.पण मी थांबलो नाही. का? कारण मला माहित होते मी एकटा नाही.माझ्या लेखणीने लाखो आवाजहीन लोकांचा आवाज उचलला.आज तुम्हाला समान हक्क देणारे हे सविधान. मी माझ्या आयुष्यातील काही वर्ष बलिदान देऊन तयार केले. तुम्ही डोके वर करून चालावे म्हणून मी माझे आरोग्य बलिदान दिले. आता हे संविधान काय आहे त्याचा तुमच्यासाठी काय अर्थ आहे ते जाणून घ्या .काळजीपूर्वक ऐका आणि ते तुमच्या हृदयात जपून ठेवा.
हजारो वर्षापासून या देशात एक वेगळा कायदा प्रचलित होता मनू चा कायदा. एक असा कायदा ज्यामध्ये म्हटले होते ,की ,सर्व माणसे समान नाही .काही जण डोक्यातून जन्माला आले .काही जण पायातून जन्माला आले. काहींना शिक्षण घेण्याचा अधिकार होता तर काहींना फक्त सेवा करण्याचा. मी तो कायदा जाळून टाकला आहे आणि तुम्हाला नवीन कायदा दिला आहे ते हे नवीन संविधान दिला आहे. हे संविधान काय करते हे तुम्हाला प्रजेपासून नागरिक बनवते. काल पर्यंत तुम्ही राजाचे प्रजा होता. जमीनदाराचे गुलाम होता. आज पासून संविधानाच्या अंमलबजावणीमुळे तुम्ही या देशाचे मालक आहात.समानतेचा अधिकार आता तुम्हाला मिळाला आहे आता कोणी राजा असो की गरीब असो कोणी ब्राह्मण असो की शूद्र असो कायद्याच्या दृष्टीने सर्व समान आहेत गरीब व्यक्तीला मिळणारी शिक्षा श्रीमंत व्यक्तीसारखीच आहे मतदानाचा अधिकार हे माझे सर्वात मोठे शस्त्र आहे जे मी तुम्हाला दिले आहे.
राणीच्या पोटातून राजाचा जन्म होणे हे युग संपल आहे. आता राजा तुम्ही निवडलेला असेल.तुमचे एक मत देशाच्या पंतप्रधानाच्या मता इतकेच आहे. ते कधीही विकू नका.हे प्रतिष्ठेचे जीवन. हे संविधान फक्त तुम्हाला अन्न वस्त्र देत नाही तर ते तुम्हाला प्रतिष्ठा आणि आदर देते आता कोणी तुम्हाला अस्पृश्य म्हणून तुमचा अपमान करू शकत नाही.जर कोणी असे केले तर संविधान तुमच्या हातातील ढाल आहे. त्याच्या साह्याने तुम्ही कायदेशीर लढा ही लढू शकता. मी या संविधानात स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचे बीज पेरले आहे लक्षात ठेवा समते शिवाय स्वातंत्र अपूर्ण आहे आणि बंधुत्वाशिवाय दोन्ही निरूपयोगी आहेत. मी तुम्हाला असे घर बांधले आहे ज्याचा पाया न्यायावर आहे आता हे घर सजवणे व राखणे तुमचे काम आहे.आजच्या भाषणाचा सर्वात मोठा भाग आहे. मी तुम्हाला एक इशारा देऊ इच्छितो. संविधान किती चांगले असले तरी त्याचे व्यवस्थापन करणारी लोक वाईट असले तर संविधान शेवटी वाईट सिद्ध होईल. आणि संविधान कितीही वाईट असले तरी त्याचे व्यवस्थापन करणारी लोक चांगले असले तर ते चांगले सिद्ध होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात मला तीन धोक्यांची भीती वाटते की तुम्ही त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे.
पहिला धोका म्हणजे राजकीय लोकशाही विरुद्ध सामाजिक लोकशाही. 26 जानेवारी 1950 रोजी आपण विरोधीभासी जीवनात प्रवेश करू. राजकारणात आपल्याला समानता मिळेल.एक व्यक्ती एक मत.पण सामाजिक आणि आर्थिक जीवनात अजूनही असमानता आहे. श्रीमंत राजवाड्यात राहतात.तर गरीब झोपडया मध्ये राहतात.उच्च जाती आणि कनिष्ठ जातीमधील भेद अजूनही अस्तित्वात आहे.जर आपणही सामाजिक असमानता लवकरच दूर केली नाही तर ज्यांना याचा त्रास सहन करावा लागतो ते एक दिवस आपण इतक्या कष्टाने बांधलेल्या राजकीय लोकशाहीच्या रचनेलाच उडवून देतील. म्हणून फक्त मतदान करून समाधान मानू नका .समाजात बंधूंना पुन्हा संचयित होईपर्यंत लढा चालू ठेवला पाहिजे
दुसरा धोका म्हणजे भक्ती आणि अंधश्रद्धा. ही भारताची सर्वात मोठी कमकुवता आहे.धर्मात भक्ती हा आत्मामुक्तीचा मार्ग असू शकतो पण राजकारणात भक्ती हा अधोगती आणि हुकूमशाहीचा थेट मार्ग आहे.कोणत्याही नेत्याला, अगदी मला ही इतके महान बनवू नका, की तुम्ही तुमच्या मनाचा वापर करणे थांबवा.कोणताही माणूस इतका महान नाही. आपण त्याच्यासाठी आपले स्वातंत्र्य गहाण ठेवावे जर तुम्ही नेत्यांची पूजा केली तर तुम्ही पुन्हा स्वतःला गुलाम कराल. प्रश्न विचारायला शिका .तुम्ही तुमची बुद्धी वापरा. नायक पूजा टाळा .कारण ती लोकशाहीचा नाश करते.
तिसरा धोका म्हणजे तुमचे मार्ग सोडू नका जोपर्यंत आपल्याकडे संविधान नव्हते तेव्हा सत्याग्रह केला.रस्ते अडवले. कायदे मोडले.ते सर्व ठीक होते.पण आता आपल्याकडे संविधान असल्याने आपण अराजकतेचे व्याकरण संपवले पाहिजे .आपला मुद्दा मांडण्यासाठी हिंसाचाराचा अवलंब करू नका. रस्ते अडवू नका संविधानिक मार्गाने लढायला शिका.न्यायालयाचे दरवाजे ठोठवा. संसदेत आवाज उठवा. जर तुम्ही कायदा स्वतःच्या हातात घेतला तर तुमचे रक्षण करणाऱ्या संविधानाला कमकुवत कराल.
भविष्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मी माझे काम केले आहे.मी तुम्हाला चावी दिली आहे.ज्यामुळे तुम्ही तुमच्या नशिबाचे कुलूप उघडू शकता पण लक्षात ठेवा.तुम्ही स्वतः दार उघडून आज जावे.मी आता म्हातारा होत आहे. माझे शरीर थकत आहे. मी कदाचित तुमच्या मध्ये जास्त काळ राहणार नाही पण या गोष्टीचा मला दिलासा आहे कि, मी शतकानुतके चिखलात अडकलेला रथ योग्यरीत्या उभा केलाय तो बाहेर काढून फक्त रस्त्यावर ठेवला आहे आता तो रथ पुढे नेण्याची जबाबदारी तुमची आहे. जर तुम्ही तो पुढे नेऊ शकत नसाल तर मागे जाऊ देऊ नका. शिक्षित व्हा. फक्त पदवी मिळवण्यासाठी अभ्यास करू नका तर बरोबर आणि चूक ओळखण्यासाठी सक्षम व्हा. एकजूट राहा.जातीमध्ये विभागलेले राहू नका .तुमची ताकद तुमच्या एकतेत आहे.जर तुम्ही विखुरलात तर तुम्हाला पुन्हा चिरडले जाईल. लढा. अन्याया विरुद्ध कधी गप्प बसू नका. हे संविधान तुम्हाला सिंह बनवेल.आता मेंढ्या सारखे रडणे थांबवा .तुमच्यात या देशाचा शासक समुदाय बनण्याची क्षमता आहे. बाबासाहेब शेवटी म्हणतात आज हसा कारण तुमच्या पायातील बेड्या तुटल्या आहे.आज आनंदी राहा कारण आता तुमची मुले कोणासमोर भीक मागणार नाहीत. तर त्यांच्या डोळ्यात पाहतील.आज अभिमान बाळगा कारण तुम्ही जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे संविधान तुमच्या हातात धरले आहे पण माझा इशारा लक्षात ठेवा. हक्क ही अशी गोष्ट नाही जी कोणी तुम्हाला दे.ते हक्क अशी गोष्ट आहे की कोणीही तुमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही.तुमच्या स्वातंत्र्याचे रक्षण तुमच्या जीवापेक्षाही जास्त करा. मी तुम्हाला एक प्रबुद्ध भारताचे स्वप्न देऊन जात आहे हे स्वप्न पूर्ण कराल का ? संविधानाचे रक्षण कराल का? उठा! जागे व्हा! तुमची गमावलेली प्रतिष्ठा पूर्णपणे परत मुळे मिळेपर्यंत थांबू नका














