सोयगाव दि.२७(प्रतिनिधी)-अज्ञाताने आग लावून काढणी वर आलेल्या मक्याची पुंज जाळून नुकसान झाल्याची घटना मंगळवारी दि.२७ सकाळी सहा वाजता गलवाडा शिवारात उघडकीस आली आहे याप्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात संबंधित शेतकऱ्याने तक्रार दिली आहे.सोयगाव तहसील कार्यालयात या घटनेची नोंद घेण्यात आली आहे
तालुक्यातील गलवाडा शिवारात गट नं.-१४८ मध्ये शेतकरी काशिनाथ सोनवणे यांनी बटाईने महेंद्र बाबूसिंग हजारी यांच्या शेतात एक हेक्टर वर खरीप मक्याची लागवड केली होती दरम्यान सोमवारी रात्री अज्ञातांनी या मक्याची गंजीला आग लावून या आगीत मक्याचे पिकांचा कोळसा झाला आहे याप्रकरणी शेतकरी काशीनाथ सोनवणे यांनी अज्ञाता विरुद्ध तक्रार दिली आहे यावरून पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे दरम्यान या घटनेत अंदाजे तीन लाख रु चे नुकसान झाले आहे दरम्यान सोमवारी रात्री आठ वाजेपर्यंत मक्याची गंजी सुस्थितीत असल्याचे शेतकरी काशिनाथ सोनवणे यांनी सांगितले रात्री घरी गेल्यावर अज्ञातांनी ही आग लावल्याचे काशिनाथ सोनवणे यांनी सांगितले या मक्याचे काढणीनंतर तब्बल नव्वद क्विंटल उत्पन्न मिळणार होते असे शेतकरी सोनवणे यांनी सांगितले.या नुकसान प्रकरणी भरपाई मिळावी अशी मागणी महेंद्रसिंग हजारी,व काशिनाथ सोनवणे यांनी सोयगाव तहसील कार्यालयात संयुक्तपणे केली आहे..














