छत्रपती संभाजीनगर, दि.२८ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील लोकप्रशासन विभागाच्यावतीने येत्या शुक्रवारी (दि.३०) राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. राजस्थानचे राज्यपाल मा.हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती विभागप्रमुख डॉ.श्याम शिरसाठ यांनी दिली.
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हे चर्चासत्र होत आहे. ’कन्स्टियूशनल अॅप्रोच फॉर सस्टेनेबल डेव्लपमेंट : सेलेब्रिटिंग ७५ इयर्स ऑफ कन्स्टियूशनल इनडोमेंट’ या विषयावर हे चर्चासत्र होईल. राजस्थानचे राज्यपाल मा.हरिभाऊ बागडे पाहुणे सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच विद्यापीठ परिसरात येत आहेत. उदघाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहणार आहेत. मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल. सिफार्ट सभागृहात शुक्रवारी सकाळी १०ः३० वाजता सदर कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमास राजस्थान विद्यापीठातील प्राध्यापक डॉ.रमेश अरोरा, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर यांची प्रमुख उपस्थिती राहील. याच कार्यक्रमात विभागातील प्राध्यापक डॉ.सतीश दांडगे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त गौरव समारंभ होईल. ‘कन्स्टियूशनल अॅप्रोच फॉर सस्टेनेबल डेव्लपमेंट : फिलॉसॉफी अँड गव्हर्नन्स’ व अन्य एका विषयावर मंथन होईल.
दुपारच्या सत्रात चर्चासत्राचा समारोप होईल. यावेळी शिवाजी विद्यापीठातील प्रा.वासंती रसम, डॉ.जितेंद्र वासनिक ९नागपूर०, प्राचार्य डॉ.अजय पाटील (लातूर), डॉ.डेसी शर्मा (जयपूर) व डॉ.सुशील कांबळे (जम्मू) आदींची उपस्थिती राहणार आहे. डॉ.श्याम शिरसाठ हे कार्यशाळेचे समन्वयक तर डॉ.ज्योती धायगुडे या सह समन्वयक आहेत. कार्यशाळेत संशोधक विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.














