छत्रपती संभाजीनगर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे ७७ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. सर्वप्रथम अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्याहस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीत, राज्यगीत आणि संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.
यावेळी घाटी रुग्णालयातील नेत्रशल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख डॉ. अर्चना वरे, बालरोगचिकित्साशास्त्र विभागप्रमुख प्रभा खैरे, सहयोगी प्राध्यापक, क्ष-किरणशास्त्र डॉ. अजय वरे, सहयोगी प्राध्यापक शल्यचिकित्साशास्त्र डॉ. जुनैद शेख, डॉ. अनिता कंडी, सहेयागी प्राध्यापक प्लॅस्टिक सर्जरी डॉ. उज्वला दहिफळे, बालकर्करोगशास्त्र विभागप्रमुख डॉ. आदिती लिंगायत, प्राध्यापक सर्जिकल ऑन्कोलॉजी, डॉ. अजय बोराळकर, प्रशासकीय अधिकारी नइमोद्दीन शेख, तसेच परिचर्या पुजा राजेंद्र पाटील, अर्पिता मयुर विधे, प्रविण वाकेकर, जमादार आणि इतर १७० उत्कृष्ट आणि उल्लेखनीय काम केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
अधिष्ठाता डॉ. सुक्रे यांनी संस्थेमध्ये चालु असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रम व रुग्णसेवेत केले जाणारे अमुलाग्र बदल इत्यादीचा प्रगती अहवाल आणि भविष्यातील संस्थेची वाटचाल कशा प्रकारे करणार आहे याबद्दल सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. तसेच प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन त्यांनी विविध कक्षांना भेटी देऊन रुग्णांना मिष्टांन्नाची वाटप केली. याप्रसंगी संस्थेतील अध्यापक वृंद, नर्सिंग स्टाफ, प्रशासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.














