छत्रपती सभाजीनगर गुरुदेव समंतभद्र विद्यामंदिर मध्ये भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 77 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमाच्या रेलचेल मध्ये साजरा करण्यात आला यावेळी सकाळी वेरूळ गावातून प्रशालेतील 1200 विद्यार्थ्यांची भव्य प्रभात फेरी काढण्यात आली. “भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू हो” जय जवान जय किसान” या नाऱ्यांनी वेरूळ गावातील गावकऱ्यांचे लक्ष प्रभात फेरीकडे आकर्षित झाले होते . प्रशालेच्या भव्य प्रांगणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त दिनेश गंगवाल महामंत्री डॉ. प्रेमचंद पाटणी शालेय समिती अध्यक्ष मदनलाल पांडे कोषाध्यक्ष सुमित ठोले, ध्वजारोहक गौतमजी ठोले माजी मुख्याध्यापक निर्मल ठोले शिक्षक संजय महाजन अरुण तपशी राजेंद्र अंबरकर बाल ब्रह्मचारी पंडित मनीष भैया यांची प्रमुख उपस्थिती होती विद्यार्थ्यांच्या दैनंदिन परिपाठ अंतरंग शासन स्तरावरून आयोजित परिपत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांच्या कवायत कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले . या कार्यक्रमासाठी तहसीलदार संतोष गुट्टे गटविकास अधिकारी प्रकाश नाईक गटविस्तार अधिकारी सचिन वाघ व शिक्षण विस्तार अधिकारी किशोर केवट उपस्थित होते.यासाठी प्रशालेचे क्रीडा शिक्षक आशिष कान्हेड दिपाली बाहेती यांचे प्रमुख मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यावेळी गुलाबचंद बोराळकर यांनी केले तर प्रजासत्ताक दिनावर प्रज्वल आवटी या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले विद्यार्थ्यांतील कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टीने लेझीम पथकाच्या माध्यमातून त्रिकोण चौकोन स्वस्तिक आयात व प्रशालेचे नाव काढून विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांना अचंबीत केले या लेझीम साठी विद्यार्थ्यांना सचिन अन्नदाते वीरेंद्र वाकळे अंकुश ठोले स्वप्निल गोसावी आनंद गंगवाल यांचे मार्गदर्शन लाभले. गुरुकुल मधील विद्यार्थ्यांनी मानवी मनोऱ्याचे प्रयोग सादर केले. यासाठी हर्षवर्धन महाजन व मार्मिक गोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले भारतीय संविधानाचे महत्त्व सर्वांना लक्षात आणून देण्याच्या दृष्टीने सुहास मिश्रीकोटकर यांच्या मार्गदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी संविधान पथनाट्य सादर केले तर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्राची प्रसिद्ध लावणी गवळण बंजारा गीत भांगडा इत्यादी सिने गीतावर विद्यार्थ्यांनी नृत्याचा कार्यक्रम सादर केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सुकुमार नवले महेंद्र वाकळे यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांना राजकुमार नरखडे संतोष जैन अशोक सोनवणे पारस जैन दीपक जैन कैलास गोरे सुरज मेहत्रे प्रतिभा गंगवाल राजकुमार नरखडे प्रीतम सावजी विक्रांत करेवार पुनम लोहाडे इत्यादीचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांचे कलागुण पाहण्यासाठी यावेळी गावातील पालकांनी प्रचंड गर्दी केली होती अशी माहिती अतुल बादे नरेंद्र अजमेरा पियुष कासलीवाल यानी दिली













