सोयगाव, दि.२७ (प्रतिनिधी);-जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकी चे क्षेत्रीय अधिकारी संभाजी देशमुख यांच्या छातीत कळ येऊन वेदना होऊ लागल्याने कर्तव्यावर ते बेशुद्ध झाल्याची घटना मंगळवारी (दि.२७) दुपारी एक वाजेच्या सुमारास उमेदवारी माघारी दरम्यान घडली या कर्मचाऱ्याला तातडीने सोयगावच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या प्रकारामुळे सोयगावात निवडणूक कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे
सोयगाव तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार तथा स्ट्रॉंगरमचे क्षेत्रीय अधिकारी संभाजी देशमुख( वय-५२) हे निवडणूक कर्तव्यावर असताना अचानक त्यांच्या छातीत दुखून ते खुर्ची वरून खाली कोसळले दरम्यान हा प्रकार सोबत असलेल्या कर्मचाऱ्यांना लक्षात येताच मंडळ अधिकारी अरुण पंडित, लक्ष्मण जाधव,आणि ग्राम महसूल अधिकारी यांनी तातडीने त्यांना सोयगावच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले त्यांचेवर प्राथमिक उपचार करून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे तातडीने उपचारासाठी सायंकाळी सहा वाजता दाखल करण्यात आले आहे.या घटनेमुळे सोयगाव तहसील कार्यालयात खळबळ उडाली होती.दरम्यान सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे घाटी वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे.















