बंगळुरू, 27 जानेवारी 2026: टोयोटा किर्लोस्कर मोटर ने आपल्या लोकप्रिय SUV अर्बन क्रूझर हायरायडर साठी एक क्युरेटेड टेक पॅकेज सादर केले आहे. दैनंदिन ड्रायव्हिंग अधिक आरामदायी, सोयीस्कर आणि सुरक्षित बनवण्याच्या उद्देशाने डिझाइन करण्यात आलेले हे पॅकेज स्मार्ट व सहज वापरता येणाऱ्या तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज असून प्रत्येक प्रवास अधिक कनेक्टेड, सुरक्षित आणि प्रीमियम बनवते.
हे टेक पॅकेज अर्बन क्रूझर हायरायडरच्या सर्व व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध असून त्यात टोयोटाच्या तीन जेन्युइन अॅक्सेसरीजचा समावेश आहे — अॅम्बियंट लायटिंग, जी केबिनमध्ये आकर्षक व शांत वातावरण निर्माण करते; हेड्स-अप डिस्प्ले जे महत्त्वाची वाहन माहिती थेट ड्रायव्हरच्या दृष्टीपथात दाखवून लक्ष विचलित होणे कमी करते आणि सुरक्षितता वाढवते; तसेच डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर/कार डॅश कॅमेरा, जो सतत रेकॉर्डिंगद्वारे अतिरिक्त सुरक्षा आणि मनःशांती प्रदान करतो. हे सर्व अॅक्सेसरीज देशभरातील टोयोटा डीलरशिप्समध्ये ₹29,499 च्या एमआरपीमध्ये उपलब्ध असतील.
बी-एसयूव्ही सेगमेंटमध्ये नवे मानदंड प्रस्थापित करत
2022 मध्ये लाँच झाल्यापासून अर्बन क्रूझर हायरायडरला त्याच्या दमदार डिझाइन, प्रगत हायब्रिड तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट इंधन कार्यक्षमतेमुळे ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. ₹10.94 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होणाऱ्या किमतीसह या SUV ने अलीकडेच 2 लाखांहून अधिक युनिट्सच्या विक्रीचा टप्पा पार केला आहे, ज्यामुळे बी-एसयूव्ही सेगमेंटमध्ये तिची मजबूत उपस्थिती अधोरेखित होते. सेल्फ-चार्जिंग स्ट्राँग हायब्रिड इलेक्ट्रिक पॉवरट्रेनमुळे 27.97 किमी/लिटर इतकी प्रभावी मायलेज मिळते आणि वाहन सुमारे 60% वेळ इलेक्ट्रिक पॉवरवर चालते. पारंपरिक ड्रायव्हिंगसाठी निओ ड्राइव्ह 1.5-लिटर पेट्रोल इंजिन मॅन्युअल व ऑटोमॅटिक ट्रान्समिशन तसेच 2डब्ल्यूडीआणि 4डब्ल्यूडी पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
या एसयूवीचे डिझाइन आत्मविश्वासपूर्ण असून क्रिस्टल अॅक्रिलिक ग्रिल, सिग्नेचर ट्विन एलईडी डीआरएल, शिल्पाकृती बॉडी लाईन्स आणि 17-इंच अॅलॉय व्हील्स यांसारख्या वैशिष्ट्यांमुळे ती अधिक आकर्षक दिसते. आतील बाजूस व्हेंटिलेटेड लेदर सीट्स, पॅनोरॅमिक सनरूफ, 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह वायरलेस एप्पल कारप्ले व एंड्रॉइड ऑटो, वायरलेस चार्जिंग, USB पोर्ट्स आणि 360-डिग्री कॅमेरा यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत, ज्यामुळे आधुनिक कुटुंबांसाठी आरामदायी, प्रीमियम आणि टेक-सॅव्ही केबिन अनुभव मिळतो.
ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन अधिक बळकट करत टोयोटा 66 एक्सक्लुझिव्ह अॅक्सेसरीज, 3 वर्षे/100,000 किमीची स्टँडर्ड वॉरंटी (5 वर्षे/220,000 किमीपर्यंत वाढवता येण्याजोगी) आणि 8 वर्षे/160,000 किमीची हायब्रिड बॅटरी वॉरंटी प्रदान करते, ज्यामुळे ग्राहकांना दीर्घकालीन विश्वासार्हता, सोय आणि संपूर्ण मनःशांती मिळते.
















