छत्रपती संभाजीनगर: क्रॉम्प्टन या भारतातील सर्वात प्रतिष्ठित ग्राहक ब्रँडला जागतिक आघाडीची स्वतंत्र बाजारपेठ संशोधन कंपनी युरोमॉनिटर इंटरनॅशनलने जगातील पहिल्या क्रमांकाचा सिलिंग फॅन ब्रँड म्हणून सन्मानित केले आहे. युरोमॉनिटर इंटरनॅशनल लिमिटेडकडून मिळालेल्या या मान्यतेसह क्रॉम्प्टन भारतातील प्रतिष्ठित ब्रँड्सच्या निवडक समूहामध्ये सामील झाला आहे, जे जागतिक स्तरावर आघाडीवर आहेत आणि मायदेशासह आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये देखील मापदंड स्थापित करत आहेत.
८५ वर्षांहून अधिक काळाच्या अभिमानी वारसासह क्रॉम्प्टनच्या प्रवासामधून भारतातील नाविन्यतेमधील उत्क्रांती दिसून येते, जेथे ब्रँडने लाखो घरांमध्ये विश्वास संपादित केला आहे, तसेच कामगिरी, कार्यक्षमता व डिझाइनमध्ये जागतिक मापदंड स्थापित करत आहे. क्रॉम्प्टनची वाढ व जागतिक लोकप्रियतेचे श्रेय भारतातील अभियांत्रिकी उत्कृष्टता, उत्तम उत्पादन क्षमता आणि ग्राहकांच्या दैनंदिन गरजांबाबत असलेल्या सखोल माहितीला जाते. हा महत्त्वपूर्ण टप्पा श्रेणीमधील नेतृत्वाच्या पुढे जातो, तसेच यामधून विकास, तंत्रज्ञान, ग्राहक माहिती व उद्देशाचे संयोजन असलेल्या ब्रँड्सच्या माध्यमातून जागतिक स्तरावर भारताचा वाढता प्रभाव निदर्शनास येतो.
या यशाबाबत मत व्यक्त करत क्रॉम्प्टनचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) प्रोमीत घोष म्हणाले, ”मला अत्यंत अभिमान वाटत आहे की¸ भारतातील विविध पिढ्यांमधील ग्राहकांचा विश्वास असलेल्या क्रॉम्प्टन ब्रँडला आज जगातील पहिल्या क्रमांकाचा सिलिंग फॅन ब्रँड म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्यामधून आमच्या गतकाळासह आम्ही संशोधन व विकास, प्रगत उत्पादन आणि नेक्स्ट-जनरेशन तंत्रज्ञानांमधील सखोल गुंतवणूकीवर आधारित भविष्य-केंद्रित प्रवास ‘क्रॉम्प्टन २.०’च्या माध्यमातून चालना देत असलेले परिवर्तन देखील दिसून येते. भारतातील अत्यंत कमी ब्रँड्सनी जागतिक नेतृत्वाचा हा स्तर संपादित केला आहे आणि आम्ही आमच्या ‘मेक इन इंडिया’ पायाला अधिक मजबूत करण्याप्रती, तसेच आमची जागतिक उपस्थिती वाढवत राहण्याप्रती कटिबद्ध आहोत.”
ते पुढे म्हणाले, ”आमचे नाविन्यपूर्ण प्लॅटफॉर्म्स एक्स-टेक व न्यूक्लिअस या प्रवासाच्या भावी अध्यायाला सादर करतात, तसेच नेक्स्ट-जनरेशन फॅन तंत्रज्ञानांना सक्षम करतात, जे सर्वसमावेशक अपेक्षांच्या पलीकडे जातात. आम्ही प्लॅटफॉर्म निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, जे अनुकूल, विकासात्मक व जागतिक स्तरावर स्पर्धात्मक डिझाइननुसार भविष्यासाठी सुसज्ज आहेत. क्रॉम्प्टनमध्ये आम्ही परिवर्तनाला महत्त्व देण्यासोबत श्रेणीच्या भविष्याला नव्या उंचीवर देखील घेऊन जात आहोत.”
क्रॉम्प्टनच्या नेतृत्वाचे श्रेय सखोल ग्राहक माहिती, तंत्रज्ञान उत्कृष्टतेसह नाविन्यतेमधील स्थिर गुंतवणूकींना जाते. दरवर्षाला विक्री होणारे दोन कोटींहून अधिक पंखे आणि दर दोन सेकंदांना खरेदी केल्या जाणाऱ्या एका क्रॉम्प्टन पंख्यासह ब्रँडचा विकास ग्राहकांच्या दृढ विश्वासाशी जुडलेला आहे. २०० हून अधिक तज्ञांची समर्पित आरअँडडी (संशोधन व विकास) परिसंस्था आणि वार्षिक गुंतवणूका १०० कोटी रूपयांच्या पुढे जाण्यासह क्रॉम्प्टनने शांतमय, उच्च कार्यक्षम कार्यसंचालनासाठी फॅन्समध्ये अॅण्टी-डस्ट तंत्रज्ञान, एअर ३६०० एअरफ्लो आणि सायलण्टप्रो तंत्रज्ञान यांसारख्या श्रेणीला नव्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या नाविन्यता वितरित केल्या आहेत. या गुंतवणूका क्रॉम्प्टनचे प्रगत तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म्स एक्स-टेक व न्यूक्लिअसमध्ये देखील दिसून येतात, जे इंडक्शन व बीएलडीसी मोटर तंत्रज्ञानांच्या भावी पिढीला आकार देत आहेत. कंपनी आता फॅन्सची नवीन पिढी सादर करण्याची तयारी करत आहे, जे बीईई २.० साठी, तसेच पुढील तीन ते चार वर्षांमध्ये अपेक्षित तंत्रज्ञान परिवर्तनांसाठी देखील डिझाइन करण्यात येतील.
ब्रँडच्या डिझाइन व कार्यक्षमता उत्कृष्टतेप्रती कटिबद्धतेला देखील अतिरिक्त प्रतिष्ठित जागतिक मान्यता लाभल्या आहेत, जसे सायलण्टप्रो ब्लॉसम स्मार्ट फॅनसाठी गुड डिझाइन अवॉर्ड जपान २०२४, सायलण्टप्रो फ्लूइडो वेव्हसाठी रेड डॉट डिझाइन अवॉर्ड २०२५ व जर्मन डिझाइन अवॉर्ड २०२६.
क्रॉम्प्टन प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासह आपल्या उद्देशाशी कटिबद्ध आहे, ते म्हणजे अर्थपूर्ण नाविन्यता डिझाइन करणे, जे दैनंदिन जीवन अधिक उत्साहवर्धक करतात. क्रॉम्प्टन नाविन्यपूर्ण प्रमुख ब्रँड म्हणून जागतिक मंचावर भारताचे साभिमान प्रतिनिधीत्व करतो, जो तंत्रज्ञान, विश्वास आणि दृष्टिकोनाचा फायदा घेत ग्राहकांना आनंदित करणारी उत्पादने डिझाइन करतो.
युरोमॉनिटर इंटरनॅशनल प्रमाणन सर्वसमावेशक विशेष संशोधनावर आधारित आहे. या संशोधनांतर्गत प्रबळ पद्धतीच्या माध्यमातून जागतिक सिलिंग फॅन ब्रँड्सचे मूल्यांकन करण्यात आले, ज्यामध्ये युरोमॉनिटरचा प्रोप्रायटरी पासपोर्ट डेटाबेस, व्यापक डेस्क संशोधन, कंपनीची माहिती आणि यंत्रणेमधील सखोल तज्ञ मुलाखतींचा समावेश होता. ब्रँड्सना कॅलेंडर वर्ष २०२४ साठी जागतिक स्तरावर रिटेल युनिट विक्रीच्या आधारावर क्रमांक देण्यात आला, जेथे जगभरातील सातत्यपूर्ण श्रेणी व चॅनेल परिभाषांचा वापर करण्यात आला.
















