छत्रपति संभाजीनगर :- पी. यु. जैन विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त कुशल सुभाषचंद पाटनी आणि श्रीमती शोभा पाटनी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. प्रमुख अतिथी म्हणून जैन टॅग च्या उपाध्यक्ष सौ. उज्वला नवीनजी पाटनी, जैन शिक्षण संस्थेच्या सचिव सौ. आशादेवी देवेंद्रजी काला यांची उपस्थिती होती. जैन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महावीरजी सेठी कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. 4थी च्या विद्यार्थ्यानी मंगलाचरण गीत सादर करुन प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संस्था अध्यक्ष महावीर सेठी यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या प्रगतिविषयी, नवीन योजनविषयी माहिती दिली. डॉ. होमी भाभा वैज्ञानिक परीक्षेत समर्थ विजय सुपेकर, भूगोल प्रज्ञाशोध परिक्षेत सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्या अनन्या नितीन गांगवे, रामकृष्ण मिशन आश्रम उतारा पाठांतर स्पर्धेत तिसरा क्रमांक प्राप्त पुनम गवळी,तर ललित कला महोत्सव विभागीय स्तरावर द्वितीय पारितोषिक मिळवणारा समक्ष पिठोरे या विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. क्षितिजा महाले आणि पूनम गवळी यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण सादर केले. बालवाड़ीच्या विद्यार्थ्यानी ओम साई राम, स्वर्गात आकाशगंगा, संदेशे आते है गितावर नृत्य सादर केले. 1ली 2री च्या विद्यार्थ्यानी फिर भी दिल है हिंदुस्तानी, ही मायभूमी ही जन्मभूमि या गितावर कवायत सादर केली. लेझिम कवायत, डंबेल्स, रिंग कवायत, घुंगरू काठी, भारुड संगीतमय कवायतीचे सादरिकरण केले. धनसिंगजी शेरे यांनी ऐ मेरे वतन के लोगो या गितावर बासरिवादन केले. शाळेतुन संस्कार, शिस्त आणि राष्ट्रभक्ती यांचे बीजारोपण विद्यार्थ्यामध्ये केले जाते हे प्रशंसनीय आहे असे ध्वजारोहक कुशलजी पाटनी यांनी सांगितले, तर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात शेतकरी, सैनिक ,शिक्षक, आई-वडील आणि परमेश्वर यांचे महत्व असल्याने दररोज मुख्य अतिथि उज्वलाजी पाटनी यांनी सांगितले. महावीरजी सेठी यांच्या सामाजिक व धार्मिक कार्याची दखल घेत यांची बिनविरोधपने भारतवर्षीय दिगम्बर जैन महासभा राष्ट्रीय कार्यकारिणीत निवड, सुनीलजी सेठी यांची जैन इंजीनियर्स सोसायटी वेस्ट झोनच्या सेक्रेटरी पदावर निवड तर सौ. श्वेता राजेशजी कासलीवाल यांनी संभाजीनगर ते कुन्थलगिरी हे 185 किमी चे अंतर सायकल वर पार केल्यामुळे यांचा शालेतर्फे सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक दीपा छाबडा, श्रुती काला, रुचिता ठोले, शीतल ठोले, सुजाता मदने या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी जैन शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सुनीलजी सेठी, सहसचिव सुनीलजी अजमेरा, कोषाध्यक्ष डॉ. रमेशजी बडजाते, कार्यकारिणी सदस्य कमलजी पहाडे, राजेशजी कासलीवाल, सावनजी चूडिवाल, सुचेताजी सेठी, मीनाजी सेठी, देवेंद्रजी काला, राजकुमारजी पांडे सुवर्णा शहा, उषा पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश छाबडा, कल्पना अजमेरा यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका कविता ठोळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका कविता ठोले, जीवन सावजी, नीलेश छाबडा, मयूर लोहाडे, मयूर गंगवाल, कल्पना अजमेरा, सुनंदा संगवे, राखी बाकलीवाल, प्रियंका चुडीवाल, ज्योती बाकलीवाल, नीलेश अजमेरा यांनी शिक्षकांनी परिश्रम घेतले.















