14 जानेवारी रोजी भारत देशात मकर संक्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणा दिवशी महिला मुले मुली ज्येष्ठ नागरिक आनंदी असतात. महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रमांमध्ये एकमेकाला हळदी कुंकू लावून तिळगुळ घेऊन गोड बोला म्हणून संदेश देतात आनंद घेतात. घरी गोडधोड पदार्थ करून खातात. त्या दिवशी शाळेला सुट्टी असते.
मात्र आपल्याच घरातील आपल्याच गावातील आपल्या नातेवाईकापैकी नशिबाने एखादी विधवा महिला असेल तर तिला या उत्साहात हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात तिळगुळ घ्या गोड बोला या उपक्रमात तिला सहभागी करून घेतलं जात नाही. कारण ते अशुभ म्हणून समजले जाते. तर मी सर्वांना विनंती करतो की, या दिवशी विधवा बहिणींना सन्मान देण्यासाठी जर आपण धार्मिक असाल तर देवळामध्ये घरातल्या देव्हाऱ्यात तिच्या हस्ते दिवा लावा. त्यांच्या हस्ते देवाला नैवेद्य दाखवा.तिला हळदीकुंकू कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घ्या.नक्कीच आपण यावर विचार करा. हा उपक्रम ज्या गावात चालू आहे त्यांचा मी अभिनंदनच करतो.
परंतु ज्या गावांमध्ये हा उपक्रम चालत नाही, म्हणजे विधवा महिलांना सहभागी करून घेत नाहीत, अशा गावातील विधवा महिलांना मी विनंती करतो की त्या गावातील कोणत्याही जातीच्या सुशिक्षित आणि धाडसी विधवा महिलेने पुढाकार घेऊन गावातील पंधरा वीस ज्या विधवा महिला असतील त्यांची एक यादी करा आणि त्यांना मकर संक्राती दिवशी कोणाच्यातरी घरी बोलवा. त्यांना हळदी कुंकू लावा. तिळगुळ द्या आणि एक छोटी किमतीची एक वस्तू वाण म्हणून द्या. यासाठी माझ्याकडून वैयक्तिक पाचशे रुपये पुढाकार घेणाऱ्या महिलेच्या फोन पे वर पाठवण्यात येईल.ही मदत फक्त पहिल्या वीस विधवा महिला साठीच आहे. विधवा नसणाऱ्या महिलांनी संपर्क करू नये या ज्या महिला सहभागी होतील त्यांच्या पुन्हा एकत्रित कार्यशाळा घेण्याचा विचार असून त्यांचे नेतृत्व उभं करण्याचा हेतू आहे.
हळदी कुंकू तिळगुळ कार्यक्रमांमध्ये ज्या सहभागी होतील त्या महिलेचे नाव मोबाईल नंबर गावाचे नाव आणि मोबाईलवर कार्यक्रमाचे फोटो व व्हिडिओ शूटिंग खालील व्हाट्सअप नंबरवर पाठवल्यास मी आपला आभारी राहील. ज्या महिला पहिल्यांदा या उपक्रमामध्ये सहभागी होतील त्यांचा सन्मान होईल. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणि आनंद समाधान दिसेल. हेच खरे पुण्य असून महिलांना अशा अनिष्ट विधवा प्रथे च्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी हे छोटे उपक्रम खूप उपयोगी पडतील. आपणास काही शंका असतील तर मला फोन करू शकता. हा उपक्रम करताना जर कुणी विरोध केला तर पोलीस महिला हेल्पलाइन 112 किंवा 181 यावर त्वरित संपर्क साधून तक्रार करू शकता ताबडतोब तुम्हाला पोलीस स्टेशन कडून सहकार्य मिळेलचं
















