शहापूर/ प्रतिनिधी :– राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते अजितदादा पवार यांचे काल बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.आज अजित पवार यांच्यावर बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.अजित पवार यांच्याबद्दल संवेदना व्यक्त करण्यासाठी आज शहापूर शहरातील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून आपल्या शोकभावना व्यापाऱ्यांनी व शहापूर तालुक्यातील जनतेने व्यक्त केल्या. शहापूर शहरात काही अंशी रिक्षा वाहतूक सुरू होती. मेडिकल दुकाने,डेअरीची दुकाने वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने बंद होती.काल शहापुरातील व्यापारी मंडळानी बंदचे आवाहन केले होते त्यास लहान – मोठ्या व्यापाऱ्यांनी सहकार्य केले.
















