गंगापूर :- विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकासासोबतच शारीरिक, मानसिक, सामाजिक व भावनिक विकास घडावा आणि त्यातून सक्षम नागरिक तयार व्हावा, या उद्देशाने दशसूत्री कार्यक्रमांतर्गत गंगापूर तालुक्यातील सर्व शाळांमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी आरोग्य समुपदेशन कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले.
दि. 28 जानेवारी 2026 रोजी छत्रपती संभाजीनगरचे माननीय जिल्हाधिकारी श्री. दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्यात आला. माननीय जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर यांच्या सूचनेनुसार व उपजिल्हा रुग्णालय गंगापूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभिजित खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यशाळांमध्ये संतुलित व पौष्टिक आहाराचे महत्त्व व त्याचे दीर्घकालीन फायदे, योग्य खाण्यापिण्याच्या सवयी, वैयक्तिक स्वच्छता व हात धुण्याच्या सवयी, स्वच्छ पाण्याचा वापर, स्क्रीन टाइम मर्यादा व डोळ्यांची काळजी, मोबाईल, संगणक व सोशल मीडियाचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम, विविध प्रकारची व्यसने व त्यांचे दुष्परिणाम, किशोरवयीन आरोग्य समस्या, तणाव व भावनिक बदल आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमात उपजिल्हा रुग्णालय गंगापूर येथील डॉ. सुदाम लगास, डॉ. हर्षल धाबे, डॉ. पवन मुंदडा, डॉ. राजेंद्र कुलकर्णी, डॉ. वेदपाठक, डॉ. सूर्यवंशी, डॉ. शिवाजी म्हस्के, डॉ. सुनील शेजुळे, डॉ. विशाल ऊईके, डॉ. विनायक टीके, डॉ. शिवाजी निकम, डॉ. शीतल वेनीकर, डॉ. शुभांगी कुदळे, डॉ. प्राची पाटील, डॉ. किरण शेवाळे, डॉ. राजश्री नरवडे तसेच शरद जाधव, वैशाली मांडले, उदावंत, कांबळे, प्रविण क्षीरसागर, रविंद्र घोडके, दत्ता लोंढे आदी उपस्थित होते.
















