छत्रपती संभाजीनगर, दि.२९ : अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवार, दि. ३० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वा. आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे झपाटलेला चित्रपटातील ‘तात्या विंचू’, चौकट राजा, एक डाव भुताचा, लगे रहो मुन्नाभाई चित्रपटातील ‘महात्मा गांधी’, दशावतार चित्रपटातील ‘बाबूली मेस्त्री’ यांसारख्या अविस्मरणीय भूमिका साकारणारे व मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सुप्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी हे त्यांची मुलाखत घेणार आहेत.
शुक्रवार, दि. ३० जानेवारी २०२६ रोजी पहिल्या सत्रात सकाळी १०.०५ वा इंम्बू (IMBU) हा तुलू भाषेतील भारतीय चित्रपट प्रदर्शित होईल. (हा रिपीट शो असणार आहे). त्यानंतर दुपारी १२:०५ वा. द मॅन हू सॉ द बिअर (THE MAN WHO SAW THE BEAR) हा फ्रान्स देशाचा फ्रेंच आणि स्पॅनिश भाषेतील चित्रपट दाखविण्यात येणार आहे. दुपारी १.४० वा. पराज्य (PARAJYA) हा कन्नाडा भाषेतील भारतीय चित्रपट प्रदर्शित होईल.(हा रिपीट शो असणार आहे). त्यानंतर दुसर्या सत्रात दुपारी ३.१५ वा. बियॉन्ड द ब्लु बॉर्डर (BEYOND THE BLUE BORDER) हा जर्मनी देशाचा जर्मन भाषेतील चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सायं ५.१० वा. ग्रीटींग्ज फ्रॉम मार्स (GREETINGS FROM MARS) हा जर्मन देशाची निर्मिती असलेला जर्मन भाषेतील चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल. सायं. ६.४५ वा. सायलेंट रिबेलियन (SILENT REBELLION) हा स्वित्झर्लंड, फ्रान्स, बेल्जियमया देशाचा सहनिर्मिती असलेला फ्रेंच भाषेतील चित्रपट दाखविण्यात येणार आहे. रात्रौ ८.२५ वा. अल्फा (ALFA) हा फ्रान्स, बेल्जियम या देशाचा सहनिर्मिती असलेला फ्रेंच भाषेतील चित्रपट दाखविण्यात येणार आहे.















