छत्रपती संभाजीनगर, दि.३० : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त अर्थात हुतात्मा दिनी अभिवादन कार्यक्रम झाला.
मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले सभागृहात शुक्रवारी (दि.३०) सकाळी हा कार्यक्रम झाला. यावेळी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहुन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, संचालक डॉ.वैâलास अंभुरे यांच्यासह सर्व अधिष्ठाता, अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.
















