छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी – बँक ऑफ महाराष्ट्र रिटायर्ड एम्प्लॉईज ऑर्गनायझेशनच्या छ. संभाजीनगर युनिटचे वार्षिक अधिवेशन रविवार दि. १ फेब्रुवारी रोजी, सकाळी १०.३० वाजता श्रीनिधी हॉल, संत एकनाथ रंगमंदिरामागे, उस्मानपुरा येथे आयोजित करण्यात आले आहे. प्रमुख पाहुणे के. यु. चांदिवाल (निवृत्त न्यायमूर्ती-मुंबई उच्च न्यायालय) हे आहेत. अधिवेशनात मार्गदर्शन करण्यासाठी संघटनेच्या केन्द्रीय कार्यकारिणीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व सभासदांनी अवश्य हजर रहावे असे आवाहन उपाध्यक्ष एस.आर.कुलकर्णी यांनी केले आहे.
















