मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

सोनी सबचे कलाकार मोकळेपणाने सांगत आहेत आपले मूळ गाव, तिथली खाद्यसंस्कृती आणि सणासुदीच्या आठवणींविषयी

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
2 February 2026
in ताज्या बातम्या, मनोरंजन, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

नवीन शहरात राहायचे म्हणजे बऱ्याचदा स्वप्नांचा पाठपुरावा, लांबलचक शूटिंगच्या वेळा आणि धकाधकीचे शेड्यूल, पण तरीही आपले घर नेहमी आपल्याला साद घालतच राहते. घरच्या आठवणी, तिथले स्वाद मानत रुंजी घालत राहतात. सोनी सबवरील कलाकार- ऋषी सक्सेना, दीक्षा जोशी, श्रेनु परीख, पूजा कातुर्डे आणि रजत वर्मा सांगत आपले मूळ गाव, आपल्या लहानपणीच्या आठवणी, कुटुंबाच्या परंपरा, सणासुदीचे विधी आणि काही अविस्मरणीय आठवणींबद्दल. या आठवणी हा त्यांचा भावनिक आधार आहेत, ज्या त्यांना सतत हे भान देतात की जगरहाटीत ते कितीही लांब गेले तरी मन नेहमीच घराकडे ओढ घेत असते.

‘इत्ती सी खुशी’ मालिकेत संजयची भूमिका करणारा ऋषी सक्सेना म्हणतो, “जोधपूर शहरात मी घडलो. आजादेखील मी कोणत्याही शहरात काम करत असलो, तरी मी जेथे वाढलो त्या गल्ल्यांमध्ये माझे मन धाव घेते. तिथल्या छोट्या छोट्या गोष्टी मला खूप आठवतात. संध्याकाळच्या वातावरणात दरवळणारा मिरची वडाचा सुगंध, आईच्या हातची दाल-बाटी आणि जोधपूरची अंगभूत संथ, शांत लय. या सगळ्या गोष्टी मला फार आठवतात. आता, जेव्हा जेव्हा मी जोधपूरला जातो, तेव्हा माझ्या लहानपणाचा भाग असलेल्या ठिकाणी मी आवर्जून जातो. त्या मातीशी जुळतो. ह्या जागी गेल्यावर माझे जग विस्तारण्यापूर्वी आणि इतके व्यस्त होण्याआधी मी कोण होतो, ह्याचे स्मरण मला होते. लांब गेल्यावर मला जोधपूरचे मूल्य अधिक प्रकर्षाने जाणवते आहे. माझ्या कामाच्या निमित्ताने मी कुठेही गेलो, तरी माझ्यातील एक ऋषी नेहमी जोधपूरच्या गल्ल्यांमध्ये हुंदडत असतो.”

Slotozal 24 – новая эра азартных игр в Казахстане

‘गाथा शिव परिवार की – गणेश कार्तिकेय’ मालिकेत पार्वतीची भूमिका करणारी श्रेनु परीख म्हणते, “बडोदा माझ्या बालपणाचा सर्वात सुंदर भाग राहिला आहे. या शहराला ‘संस्कारी नगरी’ म्हणतात, हे खरे सांस्कृतिक केंद्र आहे आणि आज मी जे काही आहे ते बडोदामुळेच आहे. मी अनेक सांस्कृतिक उपक्रमांमध्ये भाग घेतला; माझे अभिनय, नृत्य, गायन आणि अगदी मॉडेलिंगचे करिअर देखील इथेच सुरू झाले. या शहराने मला माझ्या आयुष्यातील काही अतिशय प्रिय आठवणी दिल्या आहेत, विशेषतः नवरात्रीच्या. कामामुळे मी कुठेही गेलो तरी, गरबा खेळण्यासाठी मी नेहमी घरी परतलो. मित्रांसोबत नवलखी ग्राउंडवर पहाटे 4 वाजेपर्यंत नाचणे ही एक परंपरा होती, आणि त्या दरम्यान मिळालेली बक्षिसे त्या रात्रींना आणखी खास बनवत. मी एका घट्ट बांधलेल्या कुटुंबात वाढलो आणि प्रत्येक मोठ्या भावाप्रमाणेच मी माझ्या धाकट्या भावावर, शुभमवर, खूपच संरक्षक होतो. सण हे नेहमी एकत्र येण्याचे प्रतीक होते. उत्तरायण म्हणजे मामाच्या घरी पतंग उडवणे, आणि सोबत चक्की, उंधियू आणि जलेबींनी भरलेले ताट. दिवाळी नानांच्या घरी साजरी व्हायची, जिथे आम्ही साध्या क्षणांचा आनंद घेत असू आणि फाफडा, चोराफळी, मठिया यांसारख्या पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेत असू. या आठवणी आजही माझ्या मनाच्या खूप जवळ आहेत, त्या माझ्यासाठी घराची खरी ओळख ठरतात..”

पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत दीप्तीची भूमिका करणारी दीक्षा जोशी म्हणते, “अहमदाबादेत घालवलेले लहानपण आणि सेंट झेवियर्स कॉलेजातील शिक्षणाने माझी अभिरुची आणि विचारसरणी घडवली. मला कॉलेजचे वातावरण इतके आवडायचे की, कधी बुट्टी मारावीशी वाटलीच नाही. ही अशी जागा होती, जिथे तुमच्या कुतुहलाला प्रोत्साहन दिले जात होते. स्वतः अहमदाबाद मला नेहमीच सळसळते आणि साधे वाटले आहे. रंगांपासून ते नवरात्रीची ऊर्जा आणि साबरमती रिव्हरफ्रंटवर अनुभवास येणारी शांतता, इथल्या बोळांमधली गंमत आणि या शहराची लय हे सारे अनोखे आहे. 2021 मध्ये मी जेव्हा हँडपंप वापरतानाचे माझे लहानपणीचे फोटो शेअर केले, ते पाहून आता मला हसू येते की, इथले लहानपणीचे निरागस क्षण पुढे कसे मीम्स बनले. तुमचे शहर आणि लहानपणीच्या आठवणी सदैव तुमच्यापाशी राहतात. त्या तुम्हाला ऊब देतात, संस्कृती देतात आणि तुम्हाला घडवतात.”

पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत प्रार्थनाची भूमिका करणारी पूजा कातुर्डे म्हणाली, “मी पुण्याची आहे त्यामुळे मी नेहमी हिवाळ्याची वाट बघत असायचे. खास करून थंडीच्या दिवसातील पारंपरिक मराठी पदार्थ मला फार आवडायचे. माझ्या काही सुंदर आठवणीत माझी आजी प्रेमाने आमच्यासाठी तिळगूळ बनवायची त्या आठवणी आहेत. हे साधे साधे क्षण आहेत जे आजही तुम्हाला ऊब आणि विसावा देतात. यशाकडे जाण्याचा माझा प्रवास मी कॉलेजात असताना सुरू झाला. माझ्या संस्थेने मला केवळ तांत्रिक ज्ञान दिले नाही, तर माझ्यातील आत्मविश्वास, शिस्त आणि संवाद कौशल्य वाढवले. हे गुण मनोरंजन क्षेत्रात आल्यानंतरही माझ्या कामी आले. या शहरातील सणवार आणि खाद्य पदार्थ यांच्याशी माझे घट्ट नाते आहे. गणेश चतुर्थीला दगडू शेठ हलवाई गणपतीचे दर्शन आणि मिसळ पावचा आस्वाद घेणे, म्हणजे अहाहा… एकाप्रकारे मी आज जी आहे, ती पुण्यानेच घडवली आहे.

Previous Post

“माझी स्कूटी म्हणजे माझे स्वातंत्र्य होते

Next Post

पोलिसांच्या सतर्कतेने ज्वेलर्स दुकान फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला.

Related Posts

ताज्या बातम्या

Slotozal 24 – новая эра азартных игр в Казахстане

18 March 2026
ताज्या बातम्या

18 March 2026
ताज्या बातम्या

17 March 2026
Next Post
पोलिसांच्या सतर्कतेने ज्वेलर्स दुकान फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला.

पोलिसांच्या सतर्कतेने ज्वेलर्स दुकान फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला.

११ व्या अजिंठा – वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे सुवर्ण कैलास पारितोषिक परज्या चित्रपटास प्रदान

११ व्या अजिंठा - वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे सुवर्ण कैलास पारितोषिक परज्या चित्रपटास प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0

Slotozal 24 – новая эра азартных игр в Казахстане

18 March 2026

18 March 2026

17 March 2026

17 March 2026

Recent News

Slotozal 24 – новая эра азартных игр в Казахстане

18 March 2026

18 March 2026

17 March 2026

17 March 2026
मराठी न्युज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

Slotozal 24 – новая эра азартных игр в Казахстане

18 March 2026

18 March 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134

No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134