छत्रपती संभाजीनगर, दि.२ : अंडरवॉटर स्पोर्ट्स असोसिएशन इंडिया आयोजित दुसरी राष्ट्रीय मास्टर चॅम्पियनशिप आणि तिसरी राष्ट्रीय इंडोर फ्री डायव्हिंग चॅम्पियनशिप २०२५ -२६ शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये एमजीएम विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ.श्रीनिवास मोतीयेळे यांनी ५ पदके पटकावित राष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाचे नांव उज्ज्वल केले आहे.
या स्पर्धांमध्ये १०० मीटर बीएफ बाय फिन्स (सुवर्ण पदक), ५० मीटर बाय फिन्स (रौप्य पदक), ५० मीटर एपनिया (रौप्य पदक), फ्रीडायव्हिंग अंडरवॉटर स्विमिंग विदाऊट फिन्स (कांस्य पदक) आणि अंडरवॉटर स्विमिंग बाय फिन्स (कांस्य पदक) आदि पदकांचा समावेश आहे.
या यशाबद्दल डॉ.श्रीनिवास मोतीयेळे यांचे एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू प्रा.डॉ.विलास सपकाळ, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ.जॉन चेल्लादुराई, क्रीडा संचालक नितीन घोरपडे, क्रीडा विभाग प्रमुख डॉ.दिनेश वंजारे, अंडरवॉटर स्पोर्ट्स असोसिएशन इंडियाचे मयूर पाटील, आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी अभय देशमुख, डॉ.शशिकांत सिंग, डॉ.सदाशिव जव्हेरी, डॉ.रहीम खान, जॉय थॉमस, धनंजय फडके, जलतरण प्रशिक्षक अजय भोजने, निखिल पवार, अजय दाभाडे, निलेश खरे आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
















